IMPIMP

Shivsena Eknath Shinde Vs Ajit Pawar NCP | तटकरेंचा कडेलोट केला तर तुम्हाला विधानसभा निवडणुकीत हत्तीच्या पायी तुडवू, रायगडमध्ये महायुतीत वाद, मावळच्या निवडणुकीवर परिणाम होणार?

by sachinsitapure

रायगड : Shivsena Eknath Shinde Vs Ajit Pawar NCP | शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वाद अनेक ठिकाणी चव्हाट्यावर आल्याने महायुतीत वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामतीमध्ये अजित पवाराच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. तर रायगडमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. पेण येथील शिवसेनेच्या बैठकीत शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorve) यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या कडेलोटाची भाषा केली होती. आता तटकरे समर्थकांनी आमदार थोरवे यांना विधानसभा निवडणुकीत हत्तीच्या पायी तुडवू, असे प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले होते की, महायुतीच्या सूत्राचे खासदार सुनील तटकरे यांनीही पालन करायला हवे. राजकारणातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे तटकरे यांनी वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचाही कडेलोट करावा लागेल. या बैठकीला शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale), आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) देखील उपस्थित होते.

आमदार थोरवे यांच्या या वक्तव्याला आता रायगडमधील तटकरे समर्थकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे (Sudhakar Ghare) यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करताना थोरवे यांनी मर्यादा सोडली तर जशास तसे उत्तर देऊ. वरिष्ठांनी थोरवे यांना वेळीच आवर घालावा, अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हत्तीच्या पायी तुडवू, असा इशारा दिला.

सुधाकर घारे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी बळ देईल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी बालिश, अतिउत्साही असलेल्या महेंद्र थोरवे यांना तातडीने समज द्यावी.

Pune Crime Branch | पुणे : सराईत मोबाईल चोर गजाआड, गुन्हे शाखा युनिट 5 ची कारवाई

Related Posts