IMPIMP

Girish Bapat : ‘महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत पुण्याकडे दुर्लक्ष केले’

by pranjalishirish
state government neglects pune during corona period give rs 500 crore nmc bjp alleges

पुणे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात आहे. त्यामुळे आता यावरून राजकारण तापले आहे. ‘पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी व्हावी म्हणून राज्य सरकारने काही एक केलेले नाही. कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत पुण्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा गंभीर आरोप पुणे भाजपने BJP केला आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

पुण्यात कोरोनाचा उद्रेक पाहिला मिळत आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. त्यावरून भाजपने BJP  राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले. गिरीश बापट म्हणाले, ‘आता रडतखडत का होईना काही करता येत आहे. पण लॉकडाऊन जाहीर झाला तर सगळ्यांनाच पूर्ण फटका बसणार आहे. सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन कोणालाही परवडणारा नाही. तसेच केंद्र सरकारने मदत केली आहे. आता राज्य सरकारनेही करावी’.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

दरम्यान, राज्य सरकार मदत करण्याऐवजी लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे. साथीचे रोग ही राज्य सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे राज्य सरकारने पुणे महापालिकेला 500 कोटी रुपये द्यावे, अशी मागणीही भाजपकडून  BJP करण्यात आली.

‘अनिल देशमुखांवरील ‘त्या’ 100 कोटींच्या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळयात निव्वळ धुळफेक’

पुण्यावरचे संकट परतवून लावण्यासाठी प्रयत्नशील

आम्ही राजकारण करत नाही. आम्ही मदतीचा हात पुढे घेऊन आलो आहोत. तर पुण्यावरचे संकट परतवून लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि राहणार. आज एक रुग्णवाहिका दिली आहे. मात्र, अजून 11 रुग्णवाहिकांची ऑर्डर मी दिली असून, त्या राज्य सरकारच्या घोळात अडकलेल्या आहेत. त्यामुळे अद्याप मिळालेल्या नाहीत, असेही खासदार बापट म्हणाले.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts