IMPIMP

Sudhir Mungantiwar | ‘महाविकास आघाडी सरकार बाराही महिने झोपतं, यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, ‘रिश्ते में ये हमारा बाप लगता है’ – सुधीर मुनगंटीवार

by nagesh
Maharashtra Political Crisis | right now the role of wait and watch decide in the public interest as the situation changes sudhir mungantiwar maharashtra political crisis rebel

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sudhir Mungantiwar | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (शुक्रवारी) तिसरा दिवस आहे. या अधिवेनादरम्यान सत्ताधारी आघाडी सरकार आणि विरोधकात आरोपांच्या फैरी झडत आहेत. यातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) जोरदार टीका केली. ‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे विनाचालकाची गाडी आहे. त्यामुळे कधीही अपघात होण्याचा धोका आहे. हे सरकार अत्यंत उदासीन आणि कृतीशून्य आहे. सरकार सहाच काय बाराही महिने झोपून असते. यांच्याकडे बघून कुंभकर्णही म्हणेल की, रिश्ते मै ये हमारा बाप लगते है,’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

आज (शुक्रवारी) माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा विदर्भ आणि मराठवाड्यावर राग आहे. कारण विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनता ही नेहमी भाजप किंवा काँग्रेसच्या पारड्यात मत टाकते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विदर्भ, मराठवाड्याची वाट लावण्याचे ठरवले आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.

 

पुढे मुनगंटीवार म्हणाले, ‘विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सरकारने आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सरकारने याविषयी विरोधकांशी बोलायला पाहिजे होते.
भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्याशिवाय आम्ही ही निवडणूक होऊ देणार नाही.
सरकार याबाबत अधिकृतरित्या आमच्याशी चर्चा करेल तेव्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवयाचा की नाही,
याचा निर्णय भाजपकडून घेतला जाईल. सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचीही मागणी केली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | bjp leader sudhir mungantiwar slams mahavikas agahdi government

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिंद्रा लाइफस्पेस कंपनीकडून ब्लास्टिंग, परिसरातील घरांना तडे; नागरिकांची न्यायालयात धाव

Pune Crime | ‘मोक्का’मधील फरारी अक्षय खवळेला शिवणे परिसरातून अटक; पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Benefits Of Filing ITR | ‘इन्कम टॅक्स’च्या कक्षेत नसाल तरीही दाखल करा ITR, मिळतात अनेक फायदे

 

Related Posts