IMPIMP

Thane News | नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादात ‘बदला’ घेण्याचा प्रयत्न; ठाण्यात शिवसेना शाखा प्रमुखावर ‘जीवघेणा हल्ला’

by nagesh
Thane News | Attempt to take ‘revenge’ in Shiv Sena dispute against Narayan Rane; ‘Fatal attack’ on Shiv Sena branch chief in Thane

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Thane News | राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात वाद पेटला आहे. त्यातून शिवसैनिकांकडून भाजप कार्यालयावर (BJP Office) हल्ल्याचे प्रकार राज्यात ठिकठिकाणी झाले आहेत. काही ठिकाणी शिवसेना खासदार, आमदार (MP and MLA) यांच्या घरावरही हल्ले झाले आहेत. या वादाचा फायदा घेऊन बदला घेण्याचा प्रयत्न ठाण्यात झाला. शिवसेना शाखा प्रमुखाव शाखेत घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला, जेणे करुन हा या वादातूनच झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होता. पण, हल्ला करणार्‍यांपैकी एकाला नागरिकांनी पकडले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

अमित जयस्वाल हे शाखा प्रमुख या प्रकारात जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ठाण्यातील श्रीरंग सोसायटी भागात बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अमित जयस्वाल (Amit Jaiswal) हे शिवसेना शाखेत बसले असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोघे जण आले. त्यांनी अमित यांच्यावर चॉपरने तीन ते चार वार केले. अमित यांच्या आरडा ओरड्याने बाजूला असलेल्या इतरांचे तिकडे लक्ष गेले. तेव्हा पळून जाणार्‍या दोघांपैकी एकाला नागरिकांनी पकडून चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोराला ताब्यात घेतले. या हल्ल्यात अमित जयस्वाल यांच्या कानाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या हल्ल्याची माहिती मिळताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जयस्वाल यांची
प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, नागरिकांनी पकडलेल्या हल्लेखोराकडे पोलिसांची चौकशी सुरु
आहे. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे. हातगाडीच्या कलेक्शनवरुन वाद
होता. त्यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. राबोडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणे शिवसेना वादाचा गैरफायदा घेऊन आपला बदला घेण्याचा प्रयत्न नागरिकांनी हल्लेखोराला
पकडल्यामुळे अयशस्वी झाला. नाही तर त्यावरुन पुन्हा एकदा राज्यभर हल्ले सुरु होण्याचा धोका होता.

 

Web Title : Thane News | Attempt to take ‘revenge’ in Shiv Sena dispute against Narayan Rane; ‘Fatal attack’ on Shiv Sena branch chief in Thane

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 85 लाखाच्या फसवणूक प्रकरणी कमलेश नायरविरूध्द गुन्हा

Pune Crime | … म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर ! पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल

Gopichand Padlakar | आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत?

 

Related Posts