IMPIMP

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…’

by pranjalishirish
the truth in the vaze case should come out says devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी पत्र लिहित तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरूनच विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत सचिन वाझे प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे. वाझेचे पत्र गंभीर असून, या पत्राची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

‘माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव आले आहे. त्यावरून त्यांना निलंबित करून अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) ताब्यात आहेत. त्यांची चौकशीही केली जात आहे. त्यातच त्यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी अनिल देशमुख आणि अनिल परब यांचे नाव घेतले आहे. त्यांच्या या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘महाराष्ट्रात जे घडतंय ते राज्य आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी योग्य नाही. सचिन वाझे प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे. वाझेचे पत्र गंभीर असून, या पत्राची चौकशी झाली पाहिजे’.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

काय म्हटले वाझेंनी जबाबात…

सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत चौकशी बंद करण्यासाठी सैफी बुर्‍हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यास परब यांनी मला सांगितले होते. तसेच महापालिकेने ब्लॅकलिस्ट केलेल्या कंत्राटदारांकडूनही प्रत्येकी 2 कोटी गोळा करण्यास सांगितले, असा जबाब सचिन वाझेने दिला.

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

रेमिडेसिव्हरचा काळा बाजार रोखावा

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. कोरोना रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या रेमिडेसिव्हर औषधाचा काळा बाजार रोखला पाहिजे. तसेच असे करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. लाट नसणाऱ्या राज्यांतून हे औषध मागविता येईल. तसेच महाराष्ट्रात किती लससाठा शिल्लक आहे, याची आकडेवारी दिल्याचे फडणवीस Devendra Fadnavis यांनी सांगितले.

Read More : 

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Related Posts