IMPIMP

‘त्या’ मुद्द्यावरून उदयनराजे भासलेंचा टोला, म्हणाले- ‘माझ्या बुद्धीच्या बाहेर आहे, त्यांनाच विचारा’

by sikandershaikh
Udyanraje Bhosale | BJP MP udyanraje bhosale criticize bhagatsinh koshayari over chatrapati shivaji maharaj

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू केली आहे याचं नेमकं काय लॉजिक आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यांतर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले, माझ्या बुद्धीच्या बाहेर आहे. ज्यांनी लागू केला त्यांनाच विचारा.

उदयनराजे भोसले यांचा बुधवारी (दि 24 फेब्रुवारी रोजी) वाढदिवस होता. यावेळी त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून परगावी जाणं पसंत केलं. यानंतर ते साताऱ्यात परतले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या भेटी घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद झाला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारलं की, रात्रीची संचारबंदी लागू केली यामागे नेमकं काय लॉजिक आहे.
यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, मला तर काहीच कळालं नाही.
माझ्या बुद्धीच्या बाहेर आहे. ज्यांनी लागू केली त्यांनाच विचारा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी येत्या 7 दिवसात आवश्यकता भासल्यास लॉकडाऊन करू असा इशारा दिला.
यावर तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न केल्यानंतर उदयनराजे भोसले म्हणाले, लॉकडाऊन हा काही पर्याय नाही.
हा रस्ता बंद केला आणि तो रस्ता खुला केला तर, जो रस्ता बंद केला तिथं व्हायरस नाही असं म्हणता येणार नाही.
तुम्हाला तरी गॅरंटी वाटते का असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला.

पुढं बोलताना उदयनराजे (udayanraje bhosale) म्हणाले, लॉकडाऊन हा पर्याय नाही.
माझ्या माहितीप्रमाणे 2 मिलियनच्यावर व्हायरस आहेत. लॉकडाऊन करून काय करणार. दक्षता घेतली पाहिजे.
प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. आता लसीकरण मोहिम सुरू झाली आहे.
परंतु व्हायरसचे स्ट्रेन बदलतात. मी तज्ञ नाही, परंतु वाचनात आल्याचं उदयनराजेंनी यावेळी नमूद केलं.

सांगली : राष्ट्रवादीच्या धसक्यानं भाजप नेत्यांच्या बैठका आणि फोनाफोनी ! पुन्हा राजकीय भूकंप ?

Related Posts