IMPIMP

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

by pranjalishirish
Ramdas Athawale on Uddhav Thackeray | union minister ramdas athavales mischievous cirtcism on chief minister uddhav thackeray

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पोलिसानेच स्फोटके ठेवणे, पोलिस अधिकाऱ्याने कॅबिनेट मंत्र्यावर 100 कोटी रुपये वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप करणे, यामुळे ठाकरे सरकार कलंकित झाले आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून सरकार बरखास्त करा, अशी मागणी रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले Ramdas Athawale  यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. आठवले यांनी राष्ट्रपती यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

 

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर रामदास आठवले Ramdas Athawale  यांनी महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. आठवले Ramdas Athawale पुढे म्हणाले, महाराष्ट्रात घडलेल्या घटना गंभीर आहेत, जोपर्यंत महाराष्ट्रातील सरकार जात नाही, तोपर्यंत कुठलीही चौकशी होऊ शकत नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जात नाही, किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न उपस्थित करुन हे प्रकरण गंभीर असून यामध्ये मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचे आठवले Ramdas Athawale यांनी सांगितले. या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली असून राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेला नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त केले पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोले यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, विषय बनू शकतो ‘गंभीर’

रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगवर बोलताना रामदास आठवले Ramdas Athawale  म्हणाले, रश्मी शुक्ला यांनी केलेला प्रकार योग्य नाही. मात्र एखाद्या व्यक्ती किंवा राजकारणाच्या एखाद्या प्रकरणाशी संबंध येत असेल तर पोलिसांना फोन टॅपिंग करण्याचा अधिकार असल्याचे आठवले यांनी सांगितले. परंतु अनावश्यक फोन टॅपिंग झाले असले तर त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले.

Also Read : 

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

वेगवेगळया विचारसरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारांबाबत इतिहास काय सांगतो ? जाणून घ्या

Related Posts