IMPIMP

UP Assembly Speaker | युपी विधानसभा अध्यक्षांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – ‘…तर राखी सावंत महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठी झाली असती’

by nagesh
UP Assembly Speaker | uttar pradesh assembly speaker lands in controversy over rakhi sawant remark news in marathi

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था UP Assembly Speaker | ‘जर कोणी फक्त कमी कपडे घालून महान बनत असतं तर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठी झाली असती’, असं खळबळजनक वक्तव्य युपीचे (UP Assembly Speaker) विधानसभा अध्यक्ष ह्रदय नारायण दिक्षित (Hriday Narayan Dixit) यांनी केलं आहे. रविवारी झालेल्या उन्नाव येथील बांगरमाऊ विधानसभा मतदारसंघात प्रबुद्ध वर्ग संमेलना दरम्यान दीक्षित हे विधान केलं आहे. यावेळी त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. यावरुन सर्वत्र त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र, ह्रदय नारायण दिक्षित (Hriday Narayan Dixit) यांनी ट्विटच्या माध्यमातुन याबाबत स्पष्टीकरण दिलंय.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सोशल मीडियावर काही जण माझ्या एका भाषणाचा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. पंरतु, हा व्हिडीओ जो संदर्भहीन आहे. खरंतर हा व्हिडीओ उन्नावच्या प्रबुद्ध परिषदेतील माझ्या भाषणाचा फक्त एक भाग आहे. ज्यात परिषदेच्या संचालकाने माझी ओळख करून देताना मला ‘एक प्रबुद्ध लेखक’ म्हणून संबोधलं आहे. यापुढे आपल्या भाषणात राखी सावंत आणि महात्मा गांधी यांच्याबद्दलचं विधान का केलं? याचं कारणही दीक्षित यांनी सांगितलं आहे. असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

 

पुढं दिक्षित (Hriday Narayan Dixit) यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पुस्तकं आणि लेख लिहून कोणीही ज्ञानी होत नाही.
महात्मा गांधी कमी कपडे घालायचे. देशाने त्यांना ‘बापू’ म्हटलं.
पण याचा अर्थ असा नाही की राखी सावंतही गांधीजी होतील.
मित्रांनो, कृपया माझं हे भाषण केवळ वास्तविक संदर्भात स्वीकारा”, असं म्हणत दीक्षित (UP Assembly Speaker) यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलंय.
पंरतु या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

 

Web Title : UP Assembly Speaker | uttar pradesh assembly speaker lands in controversy over rakhi sawant remark news in marathi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | किरकोळ वादातून निगडीत 5 जणांकडून एकाचा खून

Digital Life Certificate | 1 ऑक्टोबरपासून लागू होतोय पेन्शनसंबंधी ‘हा’ खास नियम, तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या

BJP Former Minister Suicide | भाजपच्या माजी मंत्र्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

 

Related Posts