IMPIMP

भाजप विधानसभेची उद्या होणार बैठक; CM रावत यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

by amol
uttarakhand live updates cm trivendra singh rawat resign from post

डेहराडून : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत Trivendra Singh Rawat यांनी उत्तराखंडमधील पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी त्यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला आहे. परंतु राज्यातील मुख्यमंत्री कोण असतील? यावर संशय कायम आहे.

पक्षाने इतरांना संधी देण्याचा निर्णय घेतला
राजीनामा दिल्यानंतर त्रिवेंद्र सिंग रावत Trivendra Singh Rawat म्हणाले, पक्षाने एकत्रितपणे निर्णय घेतला की, आता राज्यातील इतर कोणालाही संधी द्यावी. पुढे ते म्हणाले की, या पदावर मला कधी काम करण्याची संधी मिळेल, याची मी कल्पना करू शकलो नव्हतो; पण भाजपने मला ही संधी दिली. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते.

मला राजीनामा देण्याचे कारण जाणून घेण्यासाठी दिल्लीला जावे लागेल
ते म्हणाले, भाजपमध्ये जे काही निर्णय घेतले जातात ते सामूहिक विचार विनिमयानंतर होतात. उद्या सकाळी १० वाजता डेहराडूनच्या पक्ष कार्यालयात विधिमंडळाची बैठक होईल. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विचार केला जाईल. प्रांतात मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताना नेत्यांना शुभेच्छा दिल्या. माझ्या राजीनाम्याचे कारण जाणून घेण्यासाठी मला दिल्लीला जावे लागेल, असे ते म्हणाले.

काँग्रेस आणि भाजपमध्ये गदारोळ आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी ट्विट केले की, ‘आता ज्या मार्गाने सत्ता परिवर्तित होताना दिसत आहे. तसेच २०२२ मध्ये भाजप जाईल आणि काँग्रेस येईल’. त्याचवेळी काँग्रेसचे उत्तराखंड प्रभारी देवेंद्र यादव म्हणाले, ‘यातून काही होणार नाही. भाजपचा काही उपयोग होणार नाही, हा भ्रष्टाचार आणि अपयशाला लपवण्याचा प्रयत्न आहे.’

‘हे’ नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे
सूत्रांच्या माहितीनुसार आमदार धनसिंह रावत, राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी आणि प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांची नावे शर्यतीत आघाडीवर आहेत. सन २००० मध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना झाल्यापासून काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी सोडून इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही.

बऱ्याच दिवसांपासून निशाण्यावर होते
त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी काही काळासाठी त्रिवेंद्र सिंग रावत यांच्या विरोधात मोर्चाबांधणी केली होती. आमदारांची नाराजी लक्षात घेता पक्षाचे उत्तराखंड प्रभारी दुष्यन्त गौतम आणि केंद्रीय पर्यवेक्षक रमण सिंग यांना डेहराडून येथे पाठवण्यात आले. येथे त्यांनी नाराजी असलेल्या आमदारांची बैठक घेतली आणि त्यांचा आक्षेप ऐकला, पण त्यांना पटवून देण्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर सीएम त्रिवेंद्र स्वतः दिल्लीत गेले आणि त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.

पक्षाचे नेतृत्व पर्यायांवर विचार करीत होते
तेव्हापासून पक्षाचे नेतृत्व पर्यायांवर विचार करीत होते. उत्तराखंडमधील जातीय समीकरण, तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतही नेतृत्वासमोर चिंता आहे. जर तातडीने परिस्थिती हाताळली गेली नाही, तर पुढच्या वर्षी त्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेने त्रिवेंद्र सिंग रावत यांचा राजीनाम्याचा निर्णय देण्यात आला.

२०१७ मध्ये पक्षाने ७० पैकी ५७ जागा जिंकल्या
उत्तराखंडमध्ये सन २०१७ मध्ये विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. ज्यामध्ये ७० पैकी ५७ जागा भाजपने जिंकल्या. त्याचवेळी काँग्रेसने ११ जागा आणि अपक्षांनी २ जागा जिंकल्या. या निवडणुका जिकल्यानंतर त्रिवेंद्र सिंग रावत Trivendra Singh Rawat यांना मुख्यमंत्री केले गेले.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts