IMPIMP

अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार, म्हणाले- ‘ज्यांना उद्योग नाहीत ते असले रिकामे मुद्दे उकरून काढतात’

by omkar
Ajit Pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – भल्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती.
त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, जी गोष्ट झाली तिला आता 14 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे.
आता ज्यांना उद्योग नाहीत ते असले रिकामे मुद्दे उकरून काढतात, असा सणसणीत टोला पवार यांनी चंद्रकांत पाटील अन् विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर लगावला आहे.

अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात, प्रकृती स्थिर

अजित पवार Ajit Pawar यांनी रविवारी (दि. 6) पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना वंदन करतो, महाराष्ट्राला शुभेच्छा देतो. ग्रामविकास विभागाने आजचा दिवस शिवस्वराज्य दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
घरोघरी, ग्रामपंचायती, कॉलेज ,सगळीकडे गुढी उभारून हा शिवस्वराज्य दिवस साजरा केला जात आहे. रायगडावरील सोहळा पाहून मोठा अभिमान वाटतो, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.
तसेच आम्ही मराठा आरक्षणावर काम करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
आजच्या दिवशी मराठा समाजाला मी अश्वस्त करतो इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचा प्रयत्न करत करत आहोत. हे लोक काही काळ आमच्याबरोबर होते.
त्यांचा आवाका किती आहे, हे आम्हा चांगले ठाऊक आहे.
त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन काही जण बोलत असतील तर फार महत्त्व द्यायची गरज नसल्याचे म्हणत पवारांनी विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांना टोला लगावला.

कचरामुक्त पुणे जिल्हा अभियानासाठी 156 कोटींचा निधी
कचरामुक्त पुणे जिल्हा अभियान सुरू आहे. 156 कोटी या अभियानासाठी दिले आहे.
खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पैसे मंजूर करून आणले आहे, अशीही माहितीही पवारांनी दिली.

Also Read:- 

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

Pune Crime News : पुण्यात 27 वर्षीय इंजिनीअर पतीचा 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला खून; ‘कोरोना’ काळाचा घेतला फायदा, लोणीकाळभोर परिसरातील घटना

Pune Crime News : लग्नापुर्वीचं ‘झेंगाट’ सुरूच, नवरा बनला होता अडसर ! 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला दुधातून झोपेच्या गोळया देऊन मारलं, पुण्यातील खळबळजनक घटना(affair)

पुण्यात आता घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरुवात, शहरात पहिलाच प्रयोग

कोलकातामध्ये भाजपच्या कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब

विहिंपनं व्यक्त केला संताप, म्हणाले – ‘ट्विटर ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागायला लागलंय, इथूनच पैसा कमावायचा अन् …’

पुण्यात शिवसेना 80 जागांवर लढणार – संजय राऊत

 

Related Posts