IMPIMP

Archeological Museum | पुण्यात उभारले जाणार देशातील पहिले ‘पुरातत्त्व’ म्युझियम

by nagesh
Archeological Museum | The country’s first archeological museum will be set up in junnar of pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Archeological Museum | देशातील पहिले पुरातत्त्व म्युझियम (Archeological Museum) पुण्यातील जुन्नर (junnar, pune) तालुक्यात साकारले जाणार आहे. तालुक्यात देशातील सर्वांत मोठा बुद्ध लेणी समूह असून, त्याचे संवर्धन करण्यासाठी हे म्युझियम उभारले जाणार आहे. त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यातील ‘डेक्कन’ कॉलेजच्या देखरेखीत या म्युझियमचे काम होत असून तसा करारही लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर काही कामांची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जुन्नर परिसराला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. डेक्कन कॉलेजच्या इतिहास व संशोधन विभागाने (Department of History and Research, Deccan College) केलेल्या उत्खननातून सातवाहन काळातील ग्रीक व रोमन संस्कृतीची ओळख जगासमोर आली आहे. इथे नाणेघाट ते पैठण सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता. याच्या खुणा आजही संशोधनातील नोंदीवर स्पष्ट दिसतात. हा वारसा जतन करण्यासाठी जुन्नर तालुक्यात म्युझियम उभारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. केंद्रातही याबाबत पाठपुरावा केला जात होता. सोलापूरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ (Punyashlok Ahilya Devi Holkar University of Solapur) व पुण्याच्या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाच्या (Department of Archeology, Deccan College Deemed University) वतीने या संग्रहालयाचे काम होत आहे.

 

मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी सांस्कृतिक व
पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी (Minister of Culture and Tourism G. Kishan Reddy) यांची पुन्हा भेट
घेऊन प्रस्तावावर निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानुसार अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश
दिले. दरम्यान, बापट यांनी डेक्कन कॉलेजने पूर्वी सादर केलेल्या प्रकल्पाची फाईल पर्यटनमंत्र्यांना दिली.
त्यानंतर पर्यटनमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर करीत महाराष्ट्रातील पुरातत्त्व विभागाच्या म्युझियमला ३०० कोटींचा
निधीही दिला. त्यामुळे जुन्नर तालुक्यात म्युझियम तयार होण्यास लवकरच सुरुवात होणर आहे. सर्वप्रथम
केंद्रीय पर्यटन विभाग आणि डेक्कन विद्यापीठ कुलगुरू प्रमोद पांडेय व सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू
डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यामध्ये करार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

डेक्कन कॉलेजचे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर साबळे (Dnyaneshwar Sable, Head of Department,
Deccan College) म्हणाले, प्राचीन काळातील स्मारकाचे अध्ययन, अवशेष याची माहिती बरोबर मानव
वसाहत, जडणघडण कशी झाली, याची सचित्र माहिती यात असणार आहे. सोलापूर व आमच्या अभिमत
विद्यापीठाचा हा संयुक्त कार्यक्रम असून दोन्ही विद्यापीठांच्या पुरातत्व विभागाने यावर काम केले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

‘डेक्कन’ची नजर….

डेक्कन कॉलेज इतिहास संशोधक व पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखालीच या म्युझियमचे काम
होणार असून त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी दिले आहेत. या
म्युझियमसाठी जुन्नर नगरपरिषदेकडून त्यांच्या मालकीच्या तीन इमारती दिल्या आहेत. यामध्ये
प्राचीन स्मारके, वारसा, उत्खननातून सापडलेले अवशेष विद्यार्थांच्या अभ्यासासाठी तयार होत आहे. जुन्नर
हे प्राचीनकाळी मोठे ट्रेड सेंटर होते. कल्याण ते नालासोपारा, जुन्नर ते पैठण आणि जुन्नर ते नाशिक असा
व्यापारी ट्रँगल होता. रिसोर्सेस असताना मानवी वसाहत व जडणघडण कशी झाली याचे उत्खननातील पुरावे अभ्यासासाठी ठेवले जाणार आहे.

 

 

गणपती विसर्जनानंतर घोषणेची शक्यता

म्युझियम संदर्भात केंद्रीय मंत्री व त्यांच्या खात्याचे सचिव, गिरीश बापट, डेक्कनचे माजी कुलगुरू डॉ.
वसंत शिंदे यांची १५ दिवसांपूर्वी बैठक झाली. बैठकीतच मंजुरी देण्यात आली. तसेच काही कामांच्या
निविदा काढून कामाला सुरुवातही झाली. हा प्रकल्प विद्यमान पुरातत्त्व विभागाचे प्रमुख पांडुरंग
साबळे यांच्या देखरेखीत असून गणपती विसर्जनानंतर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी पुणे भेटीला
येणार आहे. त्यावेळी ते या म्युझियमबाबत घोषणा करणार असल्याचे समजते.

 

Web Title : Archeological Museum | The country’s first archeological museum will be set up in junnar of pune district

 

हे देखील वाचा :

New Scrapping Policy | PM मोदींकडून मोठी घोषणा ! रस्त्यावरून हटवणार जुन्या गाड्या, कमी होईल प्रदुषण

Wardha Police | गुंडांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच केला गोळीबार, परिसरात एकच खळबळ

Partner Choice | पैसा-सौंदर्य नव्हे, पुरुषांमध्ये ‘ही’ गुणवत्ता सर्वात महत्वाची मानतात महिला, जाणून घ्या कोणती

 

Related Posts