IMPIMP

New Scrapping Policy | PM मोदींकडून मोठी घोषणा ! रस्त्यावरून हटवणार जुन्या गाड्या, कमी होईल प्रदुषण

by nagesh
New Scrapping Policy | gujarat investor summit pm modi will participate in gujarat investors summit investment opportunities will increase

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  New Scrapping Policy | गुजरातमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात इन्व्हेस्टर्स समिटचे (Gujarat Investor summit) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सुद्धा व्हर्च्युअली संबोधित करत आहेत. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 75व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी (75th independence day) आजचा हा कार्यक्रम आत्मनिर्भर भारताचे मोठे लक्ष्य सिद्ध करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल (New Scrapping Policy) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मोदी म्हणाले, आज देश national automobile scrappage policy लाँच करत आहे, ही पॉलिसी भारताच्या मोबिलिटीला नवी ओळख देणार आहे. नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी, Waste to Wealth- कचर्‍यातून कांचन अभियानाचा, #CircularEconomy चा एक महत्वाचा दुवा आहे. देशातील शहरांतून प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसह वेगवान विकासाची आमची कमिटमेंट सुद्धा दर्शवते.

 

मोदी म्हणाले, आज एकीकडे भारत Deep Ocean mission च्या माध्यमातून नवीन शक्यता शोधत आहे. तर सक्युर्लर इकॉनॉमीला सुद्धा प्रोत्साहित करत आहे.
प्रयत्न हा आहे की, विकासाला आपण sustainable बनवावे, environment friendly बनवावे.
या पॉलिसीतून सामान्य कुटुंबाला सर्वप्रकारे लाभ मिळेल.
सर्वप्रथम जुनी गाडी स्क्रॅप केल्यावर एक सर्टिफिकेट मिळेल हे ज्याकडे असेल त्यास नवीन गाडी खरेदीवर रजिस्ट्रेशनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.

 

पंतप्रधान मोदी म्हणाले, यासोबतच रोड टॅक्समध्ये सुद्धा सूट दिली जाईल.
दूसरा लाभ हा होईल की, जुन्या गाडीची मेंटनन्स कॉस्ट, रिपेयर कॉस्ट, fuel efficiency, यामध्ये सुद्धा बचत होईल. या पॉलिसीतून सामान्य कुटुंबियांना सर्वप्रकारे खुप लाभ होईल.
तसेच जुन्या गाड्या, जुनी टेक्नॉलॉजीमुळे रोड अ‍ॅक्सीडेंटचा धोका जास्त असतो.
ज्यापासून मुक्ती मिळेल. चौथा लाभ, यामुळे आपल्या आरोग्यावर प्रदुषणाचा जो परिणाम होतो तो कमी होईल.

 

 

भांडवलदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Gujarat Investor summit चे आयोजन केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय आणि राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
या समिटद्वारे नवीन पॉलिसीनुसार, राज्यात वाहन स्क्रॅपिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करण्यात गुंतवणुकदारांना आकर्षित करणे मुळ उद्देश आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

पीएमओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Gujarat Investor summit मध्ये केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
गांधीनगरमध्ये गुंतवणुकदार संमेलन आयोजित करण्याचा मुख्य उद्देश अलंगमध्ये शिप-ब्रेकिंग उद्योगाद्वारे प्रस्तुत गुंतवणुकीच्या संधीकडे लक्ष आकर्षित करणे आहे.
जे एक एकात्मीक स्क्रॅपिंग हब म्हणून पुढे येत आहे.

 

Web Title : New Scrapping Policy | gujarat investor summit pm modi will participate in gujarat investors summit investment opportunities will increase

 

हे देखील वाचा :

Wardha Police | गुंडांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच केला गोळीबार, परिसरात एकच खळबळ

Partner Choice | पैसा-सौंदर्य नव्हे, पुरुषांमध्ये ‘ही’ गुणवत्ता सर्वात महत्वाची मानतात महिला, जाणून घ्या कोणती

Prepaid Smart Meter | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! मीटरमध्ये जेवढे पैसे तेवढीच वीज वापरता येणार

 

Related Posts