IMPIMP

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

by pranjalishirish
coronavirus news contact Remedesivir ncp worker shared number bjp leader directly

पिंपरी चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर Remedesivir इंजक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काहींनी याचा साठा केल्याचे समोर आले. या तुटवड्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. गुजरातमध्ये रेमडेसिविर Remedesivir  मोफत वाटण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने रेमडेसिविरची साठेबाजी केल्याचा आरोप
राष्ट्रवादीने केला आहे. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड साठी असलेल्या एका सोशल साईटवर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने रेमडेसिविरसाठी येथे संपर्क करा आणि खाली भाजप नेत्याचा नंबर टाकला आहे. तत्काळ औषध हवं असल्यास या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Pandharpur : राज्यात ‘करेक्ट’ कार्यक्रम करुन दाखवतो – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

या कार्यकर्त्याने शेअर केलेला नंबर पिंपरी चिंचवडचे भाजप नगरसेवक नामदेव ढाकेंचा असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे गेल्या दोन दिवसापासून औषधासाठी वारंवार फोन येत आहेत. या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. तत्पूर्वी पोलीस आयुक्तांनी औपचारिक तक्रार दाखल केल्यास कारवाई केली जाईल असे म्हंटले होते.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

यासंदर्भात बोलताना ढाके म्हणाले, दोन दिवसांपासून रेमडेसिविरसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येत होते. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करत त्यांना कोठे संपर्क साधायचा याची माहिती दिली. परंतु जास्तच फोन येत असल्याने या प्रकाराची सखोल तपासणी केली असता, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या फेसबुक पोस्टमध्ये माझा नंबर असल्याचे समजले. मला त्रास देण्यासाठी मुद्दाम हा प्रकार केल्याचे ढाके यांनी म्हंटले आहे. या प्रकाराची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी युथ विंगचे शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. ढाकेंनी रेमडेसिविरचे १ हजार १०० डोस स्वतः कडे असल्याचे सांगितले होते. त्यातच औषध न मिळाल्याने कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे समजले. लोकांचा त्रास कमी होण्यासाठी ढाकेंचा नंबर शेअर केल्याचे वाडकर यांनी म्हंटले आहे.

Read More : 

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts