IMPIMP

Pune ACB News | सदाशिव पेठेतील विद्युत निरीक्षण कार्यालयातील दोघांविरूध्द लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल

by nagesh
Pune ACB News | ACB Registered FIR Against Sachin Vishnu Gajre & Balu Kashinath Bidkar In Bribe Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB News | सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth) उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षण
कार्यालयातील दोघांविरूध्द 12 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून (Anti Corruption Bureau Pune) विश्रामबाग पोलिस ठाण्यात
(Vishrambaug Police Station) गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB News)

 

सचिन विष्णु गाजरे Sachin Vishnu Gajre (37, पद – वरिष्ठ लिपीक) आणि बाळु काशिनाथ बिडकर Balu Kashinath Bidkar (57, पद – चालक, अतिरिक्त कार्यभार – आवक जावक लिपीक. दोघे नेमणुकीस – विद्युत निरीक्षण कार्यालय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, सदाशिव पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Pune ACB News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सदाशिव पेठेतील उद्योग, उर्जा व कामगार विभागात विद्युत ठेकेदारीचा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज केला होता. सदरचा विद्युत ठेकेदारीचा परवान्याच्या चौकशीसाठी तक्रारदार हे कार्यालयात गेले असता विद्युत ठेकेदारीचा परवाना देण्यासाठी सचिन गाजरे यांनी त्यांच्याकडे लाचेची मागण केली होती (Pune Bribe Case).

 

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली (Pune ACB Demand Trap). प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता सचिन गाजरे यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली तर बाळु बिडकर यांनी तक्रारदार यांची फाईल आवक-जावक टेबलवरून पुढे पाठविण्यासाठी 2 हजार रूपयाची लाच मागितली. त्यामुळे दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Dr. Sheetal Janve-Kharade )
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण (PI Vidyulata Chavan) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune ACB News | ACB Registered FIR Against Sachin Vishnu Gajre & Balu Kashinath Bidkar In Bribe Case

 

Pune Crime News | कामाला घेऊन जाऊन चौघांनी 2 महिलांना लुबाडले

Pune Crime News | कोंढवा पोलीस : शाळेच्या मालमत्तेच्या वादात शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या तिघांवर गुन्हा

 

Related Posts