IMPIMP

Pune Corporation | ‘शिवणे- खराडी’, ‘कात्रज-कोंढवा’ रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ‘क्रेडीट बॉंड’; मनपाआयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

by nagesh
Pune Corporation | To avoid repetition of works like roads, sidewalks, poles, drainage Pune Municipal Corporation to use GIS based 'Integrated Work Management System' - Vikram Kumar, PMC Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Corporation | शहरातील प्रलंबित शिवणे-खराडी (Shivane-Kharadi), कात्रज- कोंढवा (Katraj-Kondhwa) रस्त्यांसारखे मोठे प्रकल्प रिझर्व्ह क्रेडीट बॉंड (आरसीबी) च्या माध्यमातून करण्यासाठी महापालिका प्रशासन तयारी करत आहे. महापालिकेचे (Pune Corporation) उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण पाहाता शहरासाठी अत्यावश्यक प्रकल्प वेळेत पुर्ण करण्यासाठी आरसीबीचा पर्याय वापरण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

महापालिकेच्यावतीने शहराच्या वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच विविध परिसरांची कनेक्टीव्हीटी वाढविण्यासाठी शिवणे- खराडी हा सुमारे २२ कि.मी.चा रस्ता तसेच कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यापैकी शिवणे- खराडी रस्त्याचे काम २०१३ मध्ये सुरू करण्यात आले असले तरी भूसंपादनाच्या अडचणींमुळे आतापर्यंत या रस्त्याचे जेमतेम पन्नास टक्केच काम झाले आहे.
हे कामही सलग नसून अनेक टप्प्यांवर भूसंपादन झाले नसल्याने काम रेंगाळले आहे.
यामुळे या रस्त्याचा खर्च वाढत चालला आहे. दरम्यान, या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने टीडीआर, एफएसआयचा पर्याय जागा मालकांनी नाकारला असून रोखीने मोबदला मागितला आहे.
अशीच परिस्थिती कात्रज- कोंढवा या सुमारे साडेचार कि.मी. रस्त्यासाठी निर्माण झाली आहे.
या रस्त्याचे कामही सध्या भूसंपादनाअभावी ठप्प झाले आहे.
परंतू केवळ या दोन रस्त्यांसाठी भूसंपादनासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करणे सध्यातरी महापालिकेला अशक्य आहे.

 

प्रकल्पांना जेवढा अधिक वेळ लागेल तेवढा खर्च वाढणारच आहे आणि वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुकीचा प्रश्‍न अधिक जटील होत जाणार आहे.
या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही प्रकल्पांसोबतच शहरासाठी महत्वाचे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी भूसंपादनासाठी आरसीबीचा वापर करण्यात येणार आहे.
यापुर्वी महापालिकेने पीपीपी तत्वावर सुमारे ६०० कोटी रुपयांचे रस्ते आणि उड्डाणपुलांच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत. त्याप्रमाणेच अन्य महत्वाच्या प्रकल्पांसाठी आरसीबीचा वापर करण्यात येईल.
आरसीबीच्या माध्यमातून विकसकांना देण्यात येणार्‍या क्रेडीट बॉंड मधून महापालिकेचे परवाना शुल्क, मिळकतकर व अन्य देणी देता येणार आहेत.
तर महापालिकेलाही गतीमान विकास करता येईल.
येत्या काही दिवसांत यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येईल.
अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title : Pune Corporation | ‘Credit Bond’ for land acquisition of ‘Shivne-Kharadi’, ‘Katraj-Kondhwa’ roads; Information of Municipal Commissioner Vikram Kumar

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोने मिळतेय 9783 रुपये स्वस्त, अजूनही आहे गुंतवणुकीची संधी; पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

Sharad Pawar | IPS अधिकारी अजूनही फडणवीसांना भेटतात; शरद पवार म्हणाले…

Murder in Pune | बहिणीसोबत केलेल्या कृत्याचा घेतला बदला, पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या घटनेचा पर्दाफाश

 

Related Posts