IMPIMP

Gold Price Today | सोने मिळतेय 9783 रुपये स्वस्त, अजूनही आहे गुंतवणुकीची संधी; पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

by nagesh
Gold Price Today | income tax itr interest earned on savings account fixed deposits recurring deposits is taxed know the exemption limit

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरणीचा कल सुरूच आहे. आज म्हणजे 7 सप्टेंबर 2021 ला सुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा घट नोंदली गेली. तर चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा आज घसरण नोंदली गेली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,454 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 63,944 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याचे दर घटले, तर चांदीत विशेष बदल झाला नाही.

 

 

सोन्याचे नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात अवघी 37 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 46,417 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
या आधारावर सोने आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 9,783 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता.
या आधारावर अजूनही सोन्यात गुंतवणुकीची चांगली संधी आहे.
कारण तज्ज्ञांनुसार यावर्षी सोन्याच्या किमती 60 हजार रुपयांचा स्तर ओलांडू शकतात.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर कमी होऊन 1,815 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

चांदीचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत आज घसरणीचा कल होता. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 332 रुपयांनी कमी होऊन 63,612 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही ती 24.50 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

 

सोन्यात का झाली घट

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, डॉलरमध्ये सुधारणेनंतर सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली आहे.
तर, न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजमधील सोन्याच्या हाजीर भावातील घसरणीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर पडला आहे.
डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे गुंतवणुकदारांनी सोन्यात नफावसूली सुद्धा केली.
यामुळे सुद्धा सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली आहे.

 

Web Title : Gold Price Today | income tax itr interest earned on savings account fixed deposits recurring deposits is taxed know the exemption limit

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | IPS अधिकारी अजूनही फडणवीसांना भेटतात; शरद पवार म्हणाले…

Murder in Pune | बहिणीसोबत केलेल्या कृत्याचा घेतला बदला, पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या घटनेचा पर्दाफाश

Sharad Pawar | सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याने माझ्या ज्ञानात भर पडली’; शरद पवारांचा टोला

 

Related Posts