IMPIMP

Pune Corporation | महिलांच्या आरोग्याबाबत पुणे महापालिका आणि सत्ताधारीही उदासिन ! सॅनेटरी नॅपकिन वेंडींग मशीनचा ‘स्मार्ट मैत्रीण’ प्रकल्प वर्षभरापासून बंद

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) सीएसआर (CSR) तत्वावर सुरू केलेला सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन (Sanitary Napkin Vending Machine) व इन्सरीनेशन हा ‘स्मार्ट मैत्रीण’ (Smart Maitrin) उपक्रम वर्षभरातच बंद पडला आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून कोट्यवधी सॅनेटरी नॅपकिन्स हे कचर्‍यातच (Garbage) टाकण्यात येत आहेत. एकीकडे कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना महिलांच्या आरोग्याबाबत प्रशासन (Pune Corporation) आणि राजिकय पक्ष देखील उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महापालिकेने डिसेंबर २०१९ ला ऍक्शन कमिटी अंगेंस्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस या संस्थेसोबत पाच वर्षांसाठी करार केला होता. याअंतर्गत शहरातील महाविद्यालये, शाळा, हॉस्टेल अशा सार्वजनिक ठिकाणी सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविणे तसेच वापरलेली नॅपकिन्स गोळा करून त्यांची इन्सरेशन प्लांट मध्ये विल्हेवाट लावणे असे प्रकल्पाचे स्वरूप होते. संबंधित कंपनीने सीएसआर तत्वावर हा प्रकल्प चालवण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान या प्रकल्पसाठी घनकचरा विभागाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले होते. यामध्ये पाच कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले होते, त्यामधून ऍक्शन कमिटी अंगेंस्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस या कंपनीची निवड करण्यात आली होती. (Pune Corporation)

 

या कंपनीने २७० ठिकाणी वेंडिंग मशीन बसविण्यात आले होते. तसेच महापालिकेने पूर्वीच बसविलेल्या १२ इन्सरीनेशन प्लांट मध्ये वापरून झालेल्या नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यात येत होती. या सर्व कामांसाठी कंपनीने ४० कर्मचारीही नियुक्त केले होते. काही महिने प्रकल्प व्यवस्थित सुरू राहिला. वेंडिंग मशीनचा उपयोग विद्यार्थिनी आणि महिलांना चांगल्या पद्धतीने झाला. त्याचवेळी घनकचर्‍यातील नॅपकिन्स चे प्रमाणही घटले होते. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराचे नामांकन सुधारण्यास याचा उपयोगही झाला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान , कोरोना सुरू झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये देखील बंद झाली. याचाही परिणाम या प्रकल्पावर झाला. परंतु सॅनिटरी नॅपकिन गोळा करण्याची अथवा त्यावर प्रक्रिया करण्याची दुसरी सक्षम व्यवस्था नसल्याने नॅपकिन्सचा कचरा नेहमीच्याच कचर्‍यात येऊन प्रक्रिया प्रकल्पांवर नेण्यात येऊ लागला आहे. साधारण वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी सॅनिटरी नॅपकिन्स वर प्रक्रिया करण्याचा कुठलाही पर्याय उभारला नसल्याने यंदा स्वच्छ स्पर्धेतही पालिकेचे गुणांकन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

शहरात दरमहा एक कोटींहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्स कचर्‍यात टाकले जातात. एका सॅनिटरी नॅपकिनचे विघटन होण्यास ६०० वर्षे लागतात. यावरून सॅनिटरी नॅपकिन च्या कचर्‍याचे गांभीर्य लक्षात येते. (Sanitary napkins are thrown in the Garbage)

 

ऍक्शन कमिटी अंगेंस्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस या संस्थेने एक वर्षातच प्रकल्प गुंडाळला.
सीएसआर मधून मिळणार्‍या निधीची चणचण जाणवल्याने आर्थिक दृष्ट्या ही संस्था अडचणीत आली.
या प्रकल्पावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे सुमारे २० लाख रुपयांचे वेतनही अद्याप देण्यात आलेले नाही.
त्यामुळे संस्थेसोबत कर्मचारीही अडचणीत आले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रॉक्टर अँड गॅम्बल (Procter & Gamble) या आंतरराष्ट्रीय कंपनीने सॅनिटरी नॅपकिनवर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली आहे.
सुरवातीचे तीन वर्षे ही कंपनी स्वखर्चाने हा प्रकल्प चालविणार आहे.
रामटेकडी येथील कचरा प्रक्रियेच्या जागेमध्ये हा प्रकल्प करण्यास नुकतेच याला सर्वसाधारण सभेने (PMC General Body Meeting) मंजुरी दिली आहे.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation and ruling party are also indifferent about women’s health! Sanitary Napkin Vending Machine’s ‘Smart maitrin’ project closed for a year

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 91 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ramdas Athawale In Pune | महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला 25 जागा हव्यात; रामदास आठवले म्हणाले – ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’

 

Related Posts