IMPIMP

Pune Court | खून प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला

by nagesh
Pune Court | harassment of a minor student! Three years hard labor for a teacher in Chinchwad; A fine of Rs 50,000

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Court | ओव्हरटेक करण्यासाठी कारला साईड दिली नाही म्हणून एकास दांडके आणि दगडाने डोक्‍यात मारहाण करून खून (Murder) केल्याप्रकरणात एकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे (Sessions Judge V. A. Patravale) यांनी हा आदेश (Pune Court) दिला.

दगडू ऊर्फ सुभाष अशोक सांडभोर (वय ३०, रा. मावळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी तिघांवर गुन्हा दाखल आहे. शुभम विलास डोंगरे (वय 27, रा. जांभुळ, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ प्रशांत (वय 24) हा घटनेत जखमी झाला आहे. त्यांच्या आईने वडगाव मावळ पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. 20 जानेवारी रोजी मावळ तालुक्‍यातील जांभुळ गावात हा खून झाला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

फिर्यादींच्या दोन्ही मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये शुभम याचा मृत्यू झाला आहे. सुनील शिंदे याच्या कारला साईड न दिल्याने ही मारहाण करण्यात आली. सुनील, दगडूसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दगडू याने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल (Additional Public Prosecutor Premkumar Agarwal) यांनी विरोध केला. या गुन्ह्यात आणखी तिघांना अटक करण्यात आलेली नाही. तो घटनास्थळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना रेल्वे गेटजवळ झाली आहे. त्यावेळी रेल्वे येणार असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविली आहे. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्याला साक्षीदाराने ओळख परेडमध्ये ओळखले आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यची मागणी ॲड. आगरवाल यांनी केली. वडगाव मावळचे पोलिस उपनिरीक्षक एस. सी. चामे (Sub-Inspector of Police S. C. Chame, Wadgaon Maval) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Court | Dagdu alias Subhash Ashok Sandbhor bail denied in the murder case of wadgaon maval

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 243 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Price Today | खुशखबर ! सोने झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा ‘घसरण’; जाणून घ्या आजचा नवीन दर

PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘या’ पदासाठी होतेय 111 जणांची भरती, जाणून घ्या

 

Related Posts