IMPIMP

Pune Crime | वेंकिंज इंडियाच्या नावाने वेबसाईट, यु ट्युब चॅनल सुरु करुन गुंतवणूक करायला लावून 12 कोटींची फसवणूक

by nagesh
Cyber

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील नामवंत वेंकिंज इंडिया (Venkys India) या कंपनीची वेबसाईट, लोगो व मालकाच्या
फोटोचा वापर करुन बनावट वेबसाईट (Fake Website) व यु ट्युब चॅनल (YouTube) सुरु करुन त्याद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून (Lure Of
Investment) १२ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक (Cheating Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी
कंपनीच्या वतीने रोहन अजय भागवत (वय ३२, रा. रास्ता पेठ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यावरुन पोलिसांनी मोह. मोशाफी वाहिद, संतोष भातू यादव, प्रेम बिहारीलाल साहू, रंजन गुरुचरण प्रसाद कुमार, पर्जा टेक यु ट्युब चॅनेलधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १३ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकिज इंडिया ही कुक्कुटपालन क्षेत्रात काम करणारी भारतातील एक नामवंत कंपनी आहे. कंपनीचे वेंकिजफार्म डॉट नेट या नावाचे वेबसाईट व यु ट्युब चॅनल सुरु करण्यात आले. त्यात वेंकिजचे नाव, लोगो व मालकांचा फोटो वापरुन लोकांना या कंपनीमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास आवाहन व जाहिरात केली (Pune Crime).

 

 

वेंकिज फार्म मध्ये गुंतवणुक केल्यास त्या गुंतवणुकीचा मोबदला म्हणून तुमचे बँक खात्यात ठराविक रक्कम दर आठवड्याला ट्रान्सफर करण्यात येईल, असे आमिष दाखविण्यात आले. नागरिकांचे पैसे आपल्या खात्यावर ऑनलाईन घेऊन गुंतवणुक करणार्‍या नागरिकांची फसवणूक केली आहे. तसेच यु ट्युब चॅनलवर कंपनीची जाहिरात करुन कंपनीचे नावावर नागरिकांना पैसे भरावयास लावून कंपनीची जनमानसात प्रतिमा मलीन करण्यात आली. वेंकिज फार्म ही या क्षेत्रात नामवंत कंपनी असल्याने हे कंपनीचेच आवाहन आहे, असे वाटून पुणे व इतर राज्यातील नागरिकांनी तेथे दिलेल्या वॉलेटवर पैसे भरले. त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर न झाल्याने त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा आपल्या कंपनीच्या नावावर फसवणूक केली जात असल्याचे कंपनीला समजले. त्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत १२ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. पोलीस निरीक्षक विजय खोमणे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 12 crore fraud by launching fake website YouTube channel in the name of Venkys India

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बनावट ई मेलआयडीद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची बदनामी करुन दीड कोटींचे नुकसान

Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात

CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

 

Related Posts