IMPIMP

Pune Crime | पुण्यातील 21 वर्षीय तरूणीला आईचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं समजलं, ब्रॉयफ्रेन्डच्या मदतीनं केलं असं काही…

by bali123
Pune Crime | 21 year old daughter blackmail mother for extra marital affair with another person demand 15 lakh ransom pune police crime branch arrested two

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आपल्या आईचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध (Mother’s Relationship) असल्याची माहिती 21 वर्षीय तरुणीला समजली. याचा गैरफायदा घेत तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आईला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. आईचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा सुगावा लागल्यानंतर तरुणीने आईचं व्हॉट्सअ‍ॅप हॅक केलं. त्यानंतर आईचे आणि तिच्या प्रियकराचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी (Demand Rs 15 Lakh Ransom) मागितली होती. परंतु आईच्या प्रियकराने पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुलीचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या (Pune Crime) ठोकल्या आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

नेमका काय आहे प्रकार ?

फिर्यादी व्यक्तीचे आरोपी तरुणीच्या 40 वर्षाच्या आईसोबत प्रेमसंबध सुरु होते. या दोघांच्या प्रेम संबंधाचा सुगावा मुलीला लागला. आपल्या आईचं परपुरषासोबत प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी मुलीने आपल्याच आईचं व्हॉट्सअ‍ॅप हॅक केलं. त्यावेळी तिला दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. तसेच काही फोटो आणि व्हिडिओ देखील तिला मिळाले.

तरुणीने हे फोटो आणि व्हिडिओ तिचा प्रियकर मिथुन गायकवाड Mithun Gaikwad (वय-29) याला दाखवले. यानंतर खंडणीचा प्रकार सुरु झाला. आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधला. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच बदनामी टाळण्यासाठी 15 लाख रुपये मागितले. दबावाला बळी पडून तक्रारदार यांनी 2 लाख 60 हजार रुपये आरोपींना वेळोवेळी दिले.

परंतु आरोपींनी पैशांची मागणी कमी केली नाही. त्यामुळे आईच्या प्रियकराने याची माहिती पोलिसांना दिली.
यानंतर तक्रारदारनं उर्वरित पैसे घेण्यासाठी आरोपींना दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganpati) मंदिराजवळ बोलावले.
याठिकाणी पैसे घेण्यासाठी आलेल्या मिथुन गायकवाड याला पोलिसांनी एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यानं आपल्या प्रेयसीसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं (Pune Police Crime Branch) दोघांनाही अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 21 year old daughter blackmail mother for extra marital affair with another person demand 15 lakh ransom pune police crime branch arrested two

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 278 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | ‘कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली’ – प्रशासकीय अधिकारी मिनाक्षी राऊत

BCCI | रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह ! भारताच्या तिन्ही कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये 

Related Posts