IMPIMP

Pune Crime | पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन 26 वर्षीय पत्नीचा खून ! मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासवर दिला टाकून

by nagesh
Mumbai Crime | mother murdered by son for greed of wealth dead body thrown in river of matheran

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून (Murder In Pune) करुन तिचा मृतदेह (Pune Crime) साडीत गुंडाळून कात्रज बायपासजवळ (Katraj Bypass) टाकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. (Husband strangles wife to death on suspicion of character in Pune)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) पती राहुल ज्ञानोबा फडतरे (वय ३२, रा. मंतरवाडी) याला अटक केली आहे. विद्या राहुल फडतरे (वय २६) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

 

याबाबत विद्याचे वडील दत्तात्रय कृष्णा शेडगे (वय ५०, रा. परिचेता, ता. पुरंदर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल फडतरे हा वाहनचालक म्हणून काम करीत होता.
त्याचे आणि विद्या यांचा ७ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
राहुल हा विद्या हिच्या चारित्र्याचा नेहमी संशय घेत असे. त्यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणेही होत होती.
कात्रज बायपास रोडवरील मंतरवाडी येथील मोकळ्या प्लॉटच्या आतमध्ये साडीत गुंडाळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह हडपसर पोलिसांना आढळून आला होता (Pune Crime).
पोलिसांनी चौकशी केल्यावर हा मृतदेह विद्या फडतरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी राहुल याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपणच चारित्र्याच्या संशयावरुन विद्याचा खून करुन मृतदेह टाकून दिल्याचे सांगितले. लोणी काळभोर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन राहुल फडतरे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे (API Digamber Bidve) अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 26 year old wife murdered in Pune on suspicion of character The body was wrapped in a saree and dumped on the Katraj bypass

 

हे देखील वाचा :

LPG Price Hike | महागाईचा डबल अटॅक ! पेट्रोल-डिझेलने दिला जोरदार झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

Petrol Diesel Price Hike | महागाईचा भडका ! 4 नोव्हेंबरनंतर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत प्रथमच वाढ; जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts