IMPIMP

Pune Crime | अकाऊंटंटनेच घातला 31 लाखांचा गंडा; दिलेल्या पासवर्डचा वापर करुन वळविले स्वत:च्या खात्यात पैसे

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कंपनीतील आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी विश्वासाने बँकेचा युझर नेम (Bank Username) व
पासवर्ड (Password) दिला असताना त्याचा गैरवापर करुन कंपनीतील अकाऊंट एक्झिक्युटीव्हने (Account Executive) कंपनीचे पैसे स्वत:च्या
खात्यात वळवून तब्बल ३१ लाख ५५ हजार ३९९ रुपयांची फसवणुक (Cheating Case) केली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी संजीव रामबाबु अगरवाल Sanjeev Rambabu Aggarwal (वय 50, रा. गंगाधाम, मार्केटयार्ड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti University Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पंकज किशोर अगरवाल Pankaj Kishore Aggarwal (वय ३६, रा. जालना) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज येथील अदि सूर्या अ‍ॅटो स्प्रिंग्स प्रा. लि. (Adi Surya Auto Springs Pvt. Ltd.) या कंपनीत 6 सप्टेबर 2019 ते 30 सप्टेबर 2021 दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज अगरवाल हा फिर्यादी यांच्या कंपनीत लेखापाल/अकाऊंट एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करीत होता. कंपनीच्या आर्थिक व्यवहाराकरीता कंपनीचे कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) व आयसीआयसीआय बँकचा (ICICI Bank) बँक युझर नेम व पासवर्ड विश्वासाने पंकज अगरवाल याच्याकडे दिला होता. त्याचा गैरवापर करुन त्याने बँक खात्यावरुन वेळोवेळी 31 लाख 55 हजार 399 रुपये स्वत:च्या बँक खात्यावर वळविले. हा गैरव्यवहार उघडकीस येऊ नये म्हणून त्याने पैसे ट्रान्सफर करता डिस्क्रीपशनमध्ये देणेकरांची नावे टाकून कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार आता उघड झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून पोलीस निरीक्षक पुराणिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 31 lakhs of money was made by the accountant himself; Transfer money to own account using given password

 

हे देखील वाचा :

Shivsena New Symbol | एकनाथ शिंदेंनी केली उद्धव ठाकरेंची कोंडी? ‘या’ दोन चिन्हांची निवडणूक आयोगाकडे केली मागणी

Pune Cyber Crime | मोबाईलवरुन हॉटेल बुकींग पडले एक लाखाला; दत्तवाडी परिसरातील घटना

Sangli Crime | आईसह तीन मुलींचे तलावात आढळले मृतदेह, पतीवर संशय; जत तालुक्यात खळबळजनक घटना

Pune Crime | सरंक्षण दलाच्या परिक्षेत कॉपी, इलेक्ट्रॉनिक डिवाईस वापरणाऱ्या उमेदवाराला अटक

 

Related Posts