IMPIMP

Shivsena New Symbol | एकनाथ शिंदेंनी केली उद्धव ठाकरेंची कोंडी? ‘या’ दोन चिन्हांची निवडणूक आयोगाकडे केली मागणी

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन निवडणूक आयोगानं (Election Commission) शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol)
गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवीन चिन्ह (Shivsena New Symbol) सुचवण्याचा पर्याय दिला आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत दोन्ही गटांना
दिली आहे. अशातच शिंदे गट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी पुन्हा वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षाचे चिन्ह (Shivsena New Symbol) गोठवल्यानंतर ठाकरे गटाने ज्या चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले होते. त्याच चिन्हांवर शिंदे गटाने
(Shinde Group) दावा केल्याची माहिती कळत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या तीन पर्यायमध्ये ठाकरे गटाच्या (Thackeray Group) यादीतील त्रिशूळ (Trishul) आणि उगवता सूर्य (Rising Sun) या दोन पर्यायांचा समावेश केला असल्याची माहिती मिळत आहे. आता दोन्ही गटांकडून सारख्याच चिन्हांची (Shivsena New Symbol) मागणी केल्यामुळे ही दोन्ही चिन्ह आता निवडणूक आयोग बाद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पसंतीची तीन चिन्ह पाठवली आहेत. यात त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा Gada (Mace) यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील त्रिशुल, उगवता सूर्य या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळे ठाकरे गटाने मागितलेल्या चिन्हांवरच शिंदे गटाने दावा करत निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

 

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri East Assembly By-Election) पार्श्वभूमीवर आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला.
त्यानंतर आयोगाने शिंदे-ठाकरे गटाला पसंतीची तीन चिन्ह, नावे कळण्यासाठी मुदत दिली होती.
रविवारी शिंदे गटाच्या बैठकीत पक्षाच्या नावाची आणि चिन्हाबाबत चर्चा करण्यात आली.
सुरुवातील तलवार, गदा आणि तुतारी या चिन्हावर चर्चा झाली. तुतारी चिन्हाला शिंदे गटाकडून प्राधान्य देण्यात आले.
मात्र आयोगाकडे चिन्हाची मागणी करताना शिंदे गटाने त्रिशूळ आणि उगवता सूर्य आणि गदा हे चिन्ह मागितली आहेत.
त्यामुळे निवडणूक आयोग ही दोन्ही चिन्ह बाद करण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shivsena New Symbol | after uddhav thackeray cm eknath shinde also demanded the rising sun trishul symbol for election

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | आईसह तीन मुलींचे तलावात आढळले मृतदेह, पतीवर संशय; जत तालुक्यात खळबळजनक घटना

Pune Cyber Crime | मोबाईलवरुन हॉटेल बुकींग पडले एक लाखाला; दत्तवाडी परिसरातील घटना

Pune Crime | सरंक्षण दलाच्या परिक्षेत कॉपी, इलेक्ट्रॉनिक डिवाईस वापरणाऱ्या उमेदवाराला अटक

 

Related Posts