IMPIMP

Pune Cyber Crime | मोबाईलवरुन हॉटेल बुकींग पडले एक लाखाला; दत्तवाडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Cyber Crime | 27 lakhs was charged to an IT youth for a loan of 40 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Cyber Crime | कुटुंबासमवेत फिरायला गोव्याला जाण्याचा विचार त्यांनी केला. त्यासाठी हॉटेल बुकींग (Hotel Booking) करण्यासाठी त्यांनी हॉटेल सर्च करुन त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा हॉटेल बुकिंग करण्याचा प्रयत्न त्यांना तब्बल एक लाखाला पडला. सायबर चोरट्यांनी त्यांच्याा खात्यातून ९४ हजार ७०० रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी पर्वती येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३३/२२) दिली आहे. (Pune Cyber Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबासह गोव्याला फिरायला जाण्याचा बेत आखत होते. त्यासाठी गोव्यातील कॅरावेला बीच रिसॉर्ट हॉटेल (Caravella Beach Resort Hotel) यांनी गुगलवर शोधले. या हॉटेलच्या बुकींगकरीता कॅरावेला बीच रिसॉर्टच्या होम पेजवरील मोबाईल क्रमांकावर फिर्यादी यांनी फोन केला. तो नंबर नेमका सायबर चोरट्यांचा निघाला. त्या फोनवर सक्सेना असे नाव सांगणार्‍याने त्यांना हॉटेल बुकींगसाठी २५ हजार रुपये अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी त्या खात्यावर २५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर बुकींग रिसीट जनरेट करण्यासाठी गुगल पे ट्रान्झेक्शन (Google Pay Transactions) फिचरचा वापर करुन त्यावर त्यांना रिसीट नं. ३९८५० व २९८५० असे बुकींग आयडी टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर त्यांच्या खात्यातून ३९ हजार ८५० रुपये व २९८५० रुपये कट झाले. अशा प्रकारे एकूण ९४ हजार ७०० रुपयांची त्यांची फसवणूक (Fraud Case) झाली असून पोलीस निरीक्षक खोमणे (Police Inspector Khomane) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime | One lakh hotel bookings from mobile; Incidents in Dattawadi area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सरंक्षण दलाच्या परिक्षेत कॉपी, इलेक्ट्रॉनिक डिवाईस वापरणाऱ्या उमेदवाराला अटक

Maharashtra Politics | तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला, भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Pune Pimpri Crime | दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय! पिंपरी चिंचवडमध्ये होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts