IMPIMP

Pune Crime | नवीन सिरीजच्या नोटा देण्याच्या आमिषाखाली कॅम्प परिसरातील व्यावसायिकाला 35 लाखांना गंडा

by nagesh
Pune Crime | 35 lakh to a businessman in the camp area of pune under the lure of giving new series notes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | नवीन सिरीजच्या नोटा (New Series Notes) देण्याचे आमिष दाखवून नोटांच्या बदल्यात खेळण्यातील नोटांचे बंडल देऊन चोरट्यांनी एका व्यावसायिकाला तब्बल 35 लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचे (Pune Crime) समोर आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी कॅम्पमधील 52 वर्षाच्या व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सादिक मुबारक शेख Sadiq Mubarak Sheikh (रा. नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क – Koregaon Park), जसविंदर सिंग तारासिंग गुणदेव Jaswinder Singh Tarasingh Gundev (रा. रविवार पेठ) आणि जितेंद्र मेहता Jitendra Mehta (रा. भरुच, गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 22 मे ते 28 जून दरम्यान कॅम्पमधील कुमार पॅव्हिलियन येथे घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रेडिंग व्यवसाय (Trading Business) असून कॅम्पमधील कुमार पॅव्हिलियन (Kumar Pavilion) येथे कार्यालय आहे. फिर्यादी यांच्या ओळखीचे मित्र शरीफ खान हे सादिक शेख यांना 22 मे रोजी कार्यालयात घेऊन आले. शेख याने आमच्याकडे 500 रुपयांच्या नवीन सिरीजच्या नोटा आहेत. एका नोटेच्या बदल्यात दुप्पट नोटा मिळतील असे सांगितले. तुम्ही गुंतवणुकीस तयार असाल तर मी तुम्हाला डबल नोटा मिळवून देईल, असे सांगितले. तूम्ही 10 लाख रुपये गुंतविले तर 20 लाख रुपयांचा फायदा होईल, असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना विचार करुन सांगतो असे कळविले. (Fraud Case)

 

त्यानंतर 26 मे रोजी सादीक शेख हा जसविंदरसिंग याला घेऊन आला. त्याने सांगितले की, जितेंद्र मेहता आपणास एकाच्या बदल्यात दोन याप्रमाणे नविन सिरीजच्या नोटा देणार आहे. त्यांनी जसविंदर सिंग याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर 28 मे रोजी त्यांनी बँकेतून 20 लाख रुपये काढून त्यांना दिले. त्यांनी उद्या नवीन सिरीजच्या 40 लाख रुपये मिळतील असे सांगितले. दुसर्‍या दिवशी त्यांनी फोन करुन विचारल्यानंतर त्यांनी भुज येथे जायचे आहे, असे सांगितले. त्यांच्या कार्यालयातील आशिष शहा (Ashish Shah) यांना व आणखी 15 लाख रुपये घेऊन भुज येथे गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी जितेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तेव्हा त्यांनी नविन सिरीज असलेल्या नोटांची बॅग दाखविली. जितेंद्र मेहता यांच्याशी फिर्यादी यांच्याशी संपर्क करुन दिला.
तेव्हा मेहता यांनी तुम्हाला 45 लाख रुपयांच्या बदल्यात नविन सिरीजचे एक कोटी रुपये मिळतील असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी बरोबर घेतलेले 15 लाख रुपये जसविंदरसिंग व सादीक शेख यांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर तिघांनी तुमची रक्कम तुमच्या ऑफिसला येईल असे सांगितले. त्यानंतर ते पुण्यात परतले.
पुण्यात आल्यानंतर 8 जून रोजी जसविंदरसिंग ऑफिसमध्ये बॅग ठेवून गेल्याचे ऑफिस बॉयने त्यांना सांगितले.
त्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिले असता त्यात मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याचे दिसून आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर (API Shilimkar) तपास करीत आहेत.

 

 
Web Title :- Pune Crime | 35 lakh to a businessman in the camp area of pune under the lure of giving new series notes

Related Posts