IMPIMP

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

by nagesh
Military Recruitment for Woman In Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   भारतीय सैन्यदलात पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आणि अग्निवीर भरती प्रक्रियेअंतर्गत महिलांसाठी लष्करी पोलीस भरती मेळाव्याचे (Military Recruitment for Woman) आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 6 डिसेंबर ते रविवार 11 डिसेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. खडकी येथील बीईजी अँड सेंटर येथे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमणमधील तरुणींना सहभागी होता येणार आहे. देशसेवेसाठी उत्सुक असलेल्या तरुणींना यात संधी देण्यात येणार आहे. तसेच देशाच्या सेवेत आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी पुरुषांप्रमाणे महिलादेखील कुठे मागे नाहीत, हे दाखविण्यासाठी महिलांनाही लष्करात भरतीची (Military Recruitment for Woman) संधी देण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही भरती प्रक्रिया शारीरिक, वैद्यकीय आणि लेखी परीक्षा अशा तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे.
शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत यशस्वीपणे पार झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले जाणार आहे.
तसेच गुणवत्तेवर आधारित अंतिम उमेदवारांची निवड (Military Recruitment for Woman) केली जाणार आहे.
त्यासाठी मेरीट यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलात आणि लष्करी पोलीस विभागात अग्निवीर म्हणून दाखल करून घेतले जाणार आहे. या भरती मेळाव्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Military Recruitment for Woman In Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गुंगीचे औषध देऊन घरगड्यानेच केली तब्बल 24 लाखांची चोरी

Mohandas Sukhtankar Passes Away | ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

DCM Devendra Fadnavis | ‘बाबासाहेबांच्या संविधानामुळे चहावाला पंतप्रधान झाला’ – देवेंद्र फडणवीस

Yuvasena-Sharmila Yewale | पुण्यातील युवासेनेत खदखद कायम; सहसचिव शर्मिला येवले यांच्या पदाला स्थगिती

 

Related Posts