IMPIMP

Pune Crime | 60 वर्षाच्या ‘तरूणा’ नं केले शेजारणीला प्रपोज, अश्लील गाणी म्हणून विनयभंग करणाऱ्या शौकिनावर FIR

by nagesh
Pune Crime | 60 year old young man proposes to neighbor FIR against hobbyist who molested her with obscene songs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | तरुणांकडून तरुणीला प्रपोज करुन विनयभंग (molestation) केल्या प्रकरणी गुन्हे दाखल
झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र पुण्यात एक खळबळजनक अन् लज्जास्पद कृत्य एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने केलंय. त्याने शेजारी राहणाऱ्या 51
वर्षीय महिलेला प्रपोज (Propose) केल्याचा, अश्लील गाणी (Obscene Song) म्हणून तिला त्रास दिल्याने त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात
(Yerawada Police Station) विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याबाबत 51 वर्षीय शेजारी राहणाऱ्या महिलेने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरुन 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला दारुचे व्यसन आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये मागील अनेक वर्षापासून वाद आहेत. 22 ऑगस्ट रोजी आरोपी फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला. त्याने फिल्मी अंदाजात फिर्यादी महिलेला ‘तु खुप सुंदर दिसते, मला खुप आवडतेस, आपण दोघे फिरायला जावू’ असे म्हणत प्रपोज केले. तसेच अश्लील हावभाव करुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ (Abuse) केली.
यावेळी फिर्यादी महिलेने तुम्ही घरात जाऊन झोपा, मला त्रास देवू नका असे म्हटल्यानंतर तिला अश्लील भाषेत शिव्या दिल्या.
तसेच महिलेला ऐकू जातील अशा मोठ्या आवाजात अश्लील गाणी गावून तिला त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये जागेवरून वाद असून याप्रकरणात न्यायालयात आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

Web Title :- Pune Crime | 60 year old young man proposes to neighbor FIR against hobbyist who molested her with obscene songs

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग, हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 74 जणांवर कारवाई

Girls Health | पीरियड्स सुरू झाल्यानंतर थांबते मुलींच्या उंचीची वाढ! ‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे

 

Related Posts