IMPIMP

Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग, हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का

by nagesh
 Hasan Mushrif ED Raid | NCP leader hasan mushrif first reaction after ed raid on house in kagal

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ (MLA Hasan Mushrif) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कागल तालुक्यात (Kagal Taluka) भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे (BJP District President Samarjit Singh Ghatge) यांना सुरुंग लावण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच गटाचे नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समरजीत सिंह घाटगे यांच्या गटात आपल्या कार्यकर्त्यांसह (Maharashtra Political Crisis) प्रवेश केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कागल शहराच्या नगराध्यक्षा माणिक माळी (Manik Mali) व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी (Vice President Ramesh Mali) यांनी शाहू ग्रुपमध्ये (Shahu Group) प्रवेश केला आहे. यामुळे कागल तालुक्यातील मुश्रीफ गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. रमेश माळी हे हसन मुश्रीफ गटातील निष्ठावंत मानले जायचे.

 

दरम्यान, मागच्या निवडणुकीत समरजीत घाटगे यांच्या हातून थोडक्यात नगरपालिकेची (Municipality) सत्ता गेली होती. रमेश माळी मागच्या कित्येक महिन्यापासून नाराज असल्याचीही चर्चा होती. माध्यमांशी बोलताना रमेश माळी म्हणाले, मला कधीही तिथे स्वातंत्र्य दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra Political Crisis)

 

माळी म्हणाले, 21 वर्षांनी राजे साहेबांच्या घरी परतलो आहे. मला भाजपमध्ये प्रवेश करताना कोणताही संकोच वाटला नसल्याचे ते म्हणाले.
यावेळी मुश्रीफ गटावर आरोप केला. मला कधीही मुश्रीफ गटात स्वातंत्र्य मिळाले नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.

 

नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटातून राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
यापूर्वी मुश्रीफ गटातून राजे गटात माजी नगरसेवक व माजी उपनगराध्य आनंदा पसारे (Ananda Pasare),
संतोष सोनुले (Santosh Sonule) यांनीही प्रवेश केला आहे. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे.
मात्र, समरजीत सिंह घाटगे यांनी मुश्रीफांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | hasan mushrif groups manik malis entry into bjp samarjit ghatges group hasan mushrif vs samarjit ghatge

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 74 जणांवर कारवाई

Girls Health | पीरियड्स सुरू झाल्यानंतर थांबते मुलींच्या उंचीची वाढ! ‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे

Pune Crime | खेड शिवापूरमध्ये गोळीबार करत ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा, परिसरात प्रचंड खळबळ

 

Related Posts