IMPIMP

Pune Crime | एक कोटीच्या फसवणूक प्रकरणी जयदिप लडकत विरूध्द गुन्हा दाखल

by nagesh
Sangli Crime | dubai based company cheated with sangli grapes pomegranate businessman case registered

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  कागदपत्रावर वडिलांच्या खोट्या सह्या (False signature) करुन भावानेच भावाची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) वानवडी येथील आयडीबीआय बँकेत (IDBI Bank Wanwadi) घडला आहे. याप्रकरणी एकावर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जयदिप विठ्ठल लडकत Jaideep Vitthal Ladkat (रा. 907/ए/1 कुमार प्रसन्न सोसायटी, सर्व्हे नं. 44, वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी प्रसन्न विठ्ठल लडकत Prasanna Vitthal Ladkat (वय-44 रा. 907/ए/1 कुमार प्रसन्न सोसायटी, सर्व्हे नं. 44, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे दोघे भाऊ आहेत. मार्च 2020 पासून आरोपी जयदिप याने वडिलांच्या नावाने कागदपत्रावर खोट्या सह्या केल्या. तसेच कागदपत्र खरी असल्याचे सांगून आयडीबीआय बँकेच्या वानवडी शाखेतून पैसे काढले. आरोपी जयदीप याने वडिलांच्या खोट्या सह्या करुन फिर्यादी यांची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन जयदिप लडकत याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | A case has been registered against Jaideep Ladkat in a Rs 1 crore fraud case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पुण्यात अनेकांची फसवणूक; आकाश मोहिते, संभाजी निवंगुणे व पोपट निवंगुणे यांना अटक, जाणून घ्या प्रकरण

Nitin Landge Bribe case | पिंपरी-मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांना पोलीस कोठडी

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांना 25 हजार रुपयांचा दंड, चांदीवाल कमिटी समोर गैरहजर

 

Related Posts