IMPIMP

Pune Crime | किरकोळ कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | किरकोळ कारणावरुन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर
जखमी केल्याची घटना घडली (Pune Crime) आहे. ही घटना शुक्रवारी (दि.16) दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेपडळ रेल्वे गेट येथे घडली आहे.
याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत कैलास विठ्ठल हेगडे (वय-23 रा. ओमकार कॉलनी, काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नोमान उर्फ काळ्या शेख (रा. सय्यद नगर, हडपसर) व त्याच्या इतर दोन साथीदारांवर आयपीसी 307, 504, आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काळेपडळ रेल्वे गेट जवळून पायी घरी जात होते.
त्यावेळी त्यांच्या दिशेने एक कुत्रा धावून आला. त्यामुळे घाबरुन त्यांनी कुत्र्याच्या दिशेने दगड मारला.
त्याचवेळी आरोपी हे दुचाकीवरुन जात होते.
आपल्याला दगड मारल्याचा गैरसमज करुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तसेच काळ्या शेख याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात आणि डाव्या दंडावर वार केले.
यामध्ये फिर्य़ादी गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A young man was stabbed with a spear for a minor reason, an incident in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

Weight Loss | झोपण्यापूर्वी प्या हे ३ ड्रिंक्स, ‘जिम’ला न जाता होईल कॅटरिनासारखी फिगर

Nandurbar Police | खाकी वर्दीची अशीही सेवा, मृतदेहांची हेळसांड थांबवण्यासाठी अंत्यसंस्कारासाठी दिली 4 टन लाकडे; नंदुरबार पोलिसांचा सुत्य उपक्रम

Pune Crime | अतिक्रमण विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून टोळक्याकडून पत्रकारावर हल्ला, मुंढवा परिसरातील घटना

 

Related Posts