IMPIMP

Pune Crime | अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ! पिंपरी परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पिंपरी-चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बेकायदेशीरपणे गांजा बाळगून ओढत (Pune Crime) असताना 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदा सुनील शिवाजी शितोळे (वय 34, रा. जुनी सांगवी), असिफ बहादुरशहा सय्यद (वय 44, रा. काटेपुरम चौक, सांगवी), महेश मलेश रावलल्लू (वय 42, रा. जुनी सांगवी) यांना ताब्यात घेतलं आहे. सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri-Chinchwad Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने सांगवी आणि पिंपरी परिसरात केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दशक्रिया विधी घाट येथे पवना नदीच्या किनारी आडोशाला तिघेजण बेकायदेशीर गांजा ओढत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीवरुन पोलिस पथकाने शनिवारी (18 डिसेंबर) रोजी कारवाई केली. आरोपी सुनील शितोळे (Sunil Shitole), असिफ सय्यद (Asif Syed), महेश रावलल्लू (Mahesh Rawallu) यांना ताब्यात घेतले. यांच्याकडून 1 हजार रुपये किमतीचा 40 ग्रॅम गांजा आणि 35 रुपयांचे गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी फिर्याद अमली पदार्थ विरोधी पथकाचे एपीआय जिलाणी मोमीन (API Jilani Momin) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) दिली. (Pune Crime)

 

दरम्यान, पोलिसांनी दुस-या केलेल्या कारवाईमध्ये यश सर्जेराव खवळे (Yash Sarjerao Khawale) (वय 19, रा. भाटनगर झोपडपट्टी, पिंपरी),
मिनाज अजीज आलम (Minaj Aziz Alam) (वय 26, रा. काळेवाडी स्मशानभूमीजवळ) यांना ताब्यात घेतलं आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या (Pimpri Police Station) हद्दीत भाटनगर येथे दोघेजण गांजा ओढत असल्याची माहिती मिळाली.
त्यानूसार पथकाने रविवारी (19 डिसेंबर) रोजी कारवाई केली. या दोन्ही आरोपींकडून 10 ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य,
असा एकूण 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी फिर्याद अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजेंद्र बांबळे (Police Constable Rajendra Bamble) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | anti narcotics cell arrests five cannabis case pimpri chinchwad

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! 20 हजार रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो फायदा; समजून घ्या गणित

Pune Crime | ‘साहब आपके कॉलर पर किडा है’ असं सांगून गळ्यातील सोनसाखळी पळवली

Subhash Desai | मंत्री सुभाष देसाईंचा मोठा दावा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पळवापळवी झाली’

 

Related Posts