IMPIMP

Pune Crime | ‘साहब आपके कॉलर पर किडा है’ असं सांगून गळ्यातील सोनसाखळी पळवली

by nagesh
Pune Crime | Mangalsutra of three women was snatched while visiting the palanquin Chain Snatching In Pune

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शर्टच्या कॉलरवर किडा असल्याचे सांगून कामगाराने मालकाच्या गळ्यातील सोनसाखळी (gold chain) चोरून नेल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे घडली आहे. आरोपी कामगाराने मालकाच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची 2 तोळे वजनाची सोनसाखळी हिसका मारुन (snatched) चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि.17) रात्री साडेसातच्या सुमारास बेबडओव्हळ (Bebdovhal) गावच्या हद्दीत घडली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

शिवशंकर (पूर्णनाव पत्ता माहित नाही रा. उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) शिरगाव पोलीस चौकीत (shirgaon police chowki) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल शंकरराव ढमाले Rahul Shankarrao Dhamale (वय-42 रा. बेबड ओव्हळ, ता. मावळ) यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल ढमाले यांचे इंजीनियरिंग वर्कशॉप (Engineering Workshop) आहे.
याठिकाणी आरोपी शिवशंकर हा कामाला आहे. त्याला घरी सोडण्यासाठी ढमाले त्यांच्या दुचाकीवरुन जात होते.
बेबडओव्हळ येथे आढले रोडवर एका शेताजवळून जात असताना शिवशंकर याने साहब आपके कॉलर पर किडा है,
असे म्हणून ढमाले यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसका मारून तोडली आणि पळून गेला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित (PSI Gavit) करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | gold chain snatched pimpri chinchwad area

 

हे देखील वाचा :

Subhash Desai | मंत्री सुभाष देसाईंचा मोठा दावा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पळवापळवी झाली’

Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 77 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दारुचे दुकान लुटले

 

Related Posts