IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फुरसुंगीतील घटनेत 5 जणांना अटक

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पूर्व वैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाच्या कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार फुरसुंगीमधील भेकराईनगर (bhekrai nagar fursungi) येथील ढमाळवाडीमध्ये (Dhamalwadi) मंगळवारी साडेआठ वाजता घडला. या प्रकरणी कविता प्रभाकर रुक्के (वय ४०, रा. महाराष्ट्र कॉलनी, ढमाळवाडी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिसांकडे (Hadapsar News) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पाच जणांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

कृष्णा ऊर्फ चिक्या सुभाष बाळुरगी (वय २०, रा. हांडेवाडी), रुपेश विनोद धोत्रे (वय २०, रा. गोसावी वस्ती), अतुल जाधव (वय २०, रा. माळवाडी, हडपसर), अथर्व शिंदे (वय २०, रा. माळवाडी, हडपसर) आणि राहुल राठोड (वय १९, रा. गोसावी वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे (Pune Crime) आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अजय रुक्के याचे आरोपींबरोबर यापूर्वी भांडण झाले होते. मंगळवारी अजय त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरुन तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी अजय याला शिवीगाळ करुन ‘‘मारा मारा, याला मारुन टाका’’ असे बोलून कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. लोखंडी कोयते हवेत नाचवत ‘‘बघा याला कसा तोडला आम्हाला नडला त्याला असेच तोडणार’’ असे म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील (Hadapsar Police Station) सहायक पोलीस निरीक्षक थोरात (API Thorat) तपास करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Attempt to kill a young man with a scythe out of prejudice; 5 arrested in Fursungi incident hadapsar police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘सेल्फी’ दाखवून बदनामी करण्याची धमकी ! 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’

Pune Corporation | पाणी बिलाचे 78 कोटी रुपये थकविल्याने पुणे मनपानं ‘पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डा’चा पाणी पुरवठा ठेवला दिवसभर बंद; उद्याही…

 

Related Posts