Pune Crime | भाडे पळविण्यावरुन रुग्णवाहिका चालकांमध्ये राडा; चहाचे भांडे, प्लॅस्टिक कॅरेटने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) परिसरात ॲम्बुलन्सवर (Ambulance) काम करणार्या चालकांमध्ये भाडे घेण्यावरुन झालेल्या वादात दोघांनी एकावर चहाचे भांडे, प्लॅस्टिक कॅरेटने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) किरण विठ्ठल राजपुरे (Kiran Vitthal Rajpure) आणि निखील ज्ञानदेव रापपुरे Nikhil Gyandev Rapure (दोघे रा. तुकाई दर्शन, काळेपडळ, हडपसर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.
याप्रकरणी रणजित रामचंद्र जानकर Ranjit Ramchandra Jankar (वय 30, रा. मांजरी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना ससून हॉस्पिटलच्या गेटसमोरील रस्त्यावर बुधवारी पहाटे पावणे तीन वाजता घडली. (Pune Crime)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकर यांची स्वत:च्या मालकीची ॲम्बुलन्स असून ते गेली 12 वर्षे चालक म्हणून काम करतात. 12 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता ते कामावर आले. ससून हॉस्पिटलच्या गेटसमोर भाड्याची वाट पाहत होते. पहाटे पावणे तीन वाजता राजू मंगरुळे यांचे चहाच्या दुकानावर चहा पित होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे व ससून हॉस्पिटलचे परिसरात अॅम्बुलन्स चालविणारे निखील राजपूरे व किरण राजपूरे तेथे आहे. ते फिर्यादी यांना बोलले की, तू खूप दहशत करतो. आमचे भाडे घेतो व आम्हाला मारहाण करतो. आज तुला सोडणार नाही. यावरून तिघांमध्ये वाद झाला. तेव्हा किरण व निखील यांनी त्यांना शिवीगाळ करुन दुकानावर ठेवलेले प्लॅस्टिकचे कॅरेट व चहाचे भांडे घेऊन त्यांच्या डोक्यावर 5 ते 6 वेळा मारले. उजव्या हातावर प्लॅस्टिक कॅरेट व चहाचे भांड्याने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक गावडे (PSI Gawde) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Murder Case Bundgarden police station
Pune Crime | खाद्य तेलाच्या व्यवहारात 8.5 कोटींचा अपहार; मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात FIR
Shivsena MP Sanjay Raut | ‘राज्यात सरकार अस्तित्वात नाही, राज्यपाल कुठे आहेत ?’ – संजय राऊत
Comments are closed.