IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न; हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Attempt To Murder Kill Incident At Yerwada Gunjan Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन -Pune Crime | दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणावर दोघा भावांवर तलवारीने व फरशीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आकाश रवी सरोदे (वय २२), सुदर्शन रामु जाधव (वय १९, रा. सुखकर्ता कॉलनी, फुरसुंगी) आणि अमोल ऊर्फ सागर मल्हारी भिसे (वय २०, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत समीर भिमाशंकर नरळे (वय २२, रा. मंगेश तुपे चाळ, कावळेवस्ती) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याबरोबर फिर्यादी व त्यांच्या मित्रांची दुपारी भांडणे झाली होती. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र विशाल गायकवाड व त्यांचा भाऊ गणेश हे शेवाळवाडी मार्केटमागील कॅनॉलचे रोडवरुन जात असताना या टोळक्याने त्यांना अडविले.

 

टोळक्याने विशाल व गणेश यांच्यावर तलवारीने डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करुन जबर
जखमी केले. तसेच फरशीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर
पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला असून तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | attempt to murder of two brother in hadapsar area

 

हे देखील वाचा :

Pune NIV : पुण्यातील NIV ला मिळणार सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचा दर्जा, आरोग्य मंत्रालयाची हालचाल सुरू; गुणवत्ता तपासणीचा मोठा अडथळा

IND vs ENG | Jasprit Bumrah-Mohammed Shami ने इंग्लंडला असा दिली धक्का, वेगवान फलंदाजीने मॅचला दिली कलाटणी

Anti Corruption | 20 लाखांची लाच मागणारा मुंबई मोनोरेलचा चिफ ऑपरेटिंग ऑफिसर ACB च्या जाळयात

 

Related Posts