IMPIMP

Anti Corruption | 20 लाखांची लाच मागणारा मुंबई मोनोरेलचा चिफ ऑपरेटिंग ऑफिसर ACB च्या जाळयात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption | हाऊस किपिंगसह विविध कामाचे बिल काढण्यासाठी 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या मोनो रेलच्या चिफ ऑपरेटिंग ऑफिसरवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti Corruption) गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

डॉ. डी. एल. एन. मूर्ती (Dr. D L N Murti) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. फिर्यादी यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी असून कंपनीला मुंबई मोनोरेल (Mumbai Monorail) या प्रकल्पा अंतर्गत साफसफाई, हाऊस किपिंग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिस असोशिएट अशा वेगवेगळ्या कामाचे कंत्राट मिळालेले होते. जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2020 पर्यंत हे कंत्राट होते. या कामाचे त्यांनी  ऑगस्ट 2020 मध्ये कंत्राटाप्रमाणे पूर्ण केले असून त्या कामाचे 2 कोटी 50 लाख रुपये व 32 लाख बँक गॅरंटीचे असे कंपनीला पैसे मिळणे प्रलंबित होते. वारंवार प्रयत्न केल्यानंतर फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये त्यांच्या कंपनीला 2 कोटी 10 लाख रुपये बिल मिळाले. त्यानंतर जून मध्ये 22 लाख बँक गॅरंटीचे असे मुंबई मोनोरेलकडून बिल देण्यात आले होते. परंतु, अद्याप 40 लाख रुपयांचे बिल व 11 लाख रुपये बँक गॅरंटीची रक्कम प्रलंबित होती.

 

अगोदर दिलेले बिलाची रक्कम आणि प्रलंबित 40 लाख रुपयांचे बिल आणि 11 लाख बँक गॅरंटीचे
रक्कम देण्यासाठी चिफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. डि एल एन मूर्ती याने लाच मिळविण्यासाठी
फिर्यादीची फाईल स्वत:कडे अडकवून ठेवली. तसेच 20 लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ((Anti Corruption) तक्रार केली. त्यानुसार 2
ऑगस्ट रोजी त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात मूर्ती याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
मात्र, सापळा कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Anti Corruption | Chief operating officer of Mumbai Monorail, who demanded a bribe of Rs 20 lakh, has been caught by the ACB

 

हे देखील वाचा :

ATM Fraud | ATM फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठवा लक्षात, होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

Fuel Price | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, अखेर का कमी केल्या जात नाहीत इंधनाच्या किमती, हे आहे कारण

Maharashtra Unlock | राज्यातील शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, सुधारित शासन निर्णय जारी

 

Related Posts