IMPIMP

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना न्यायालयाचा दणका, घोगरेंच्या अडचणीत वाढ

by nagesh
Pune Crime | District and Sessions Court rejects BJP corporator Dhanraj Ghogare's pre-arrest bail application; Find out what's in the cart argument

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | ठेकेदाराचे अपहरण (Kidnapping) करुन त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याची प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेतल्या प्रकरणी पुण्यातील (Pune Crime) भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे (BJP corporator Dhanraj Ghogre) यांच्यासह विनोद माने पाटील, सुरेश तेलंग, आप्पासाहेब चैनागुंडा यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी (pre-arrest bail) न्यायालयात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती फिर्यादी यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांनी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

वकिलांचा युक्तीवाद

 

या प्रकरणी आज (सोमवार) जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये (District and Sessions Court) सुरेश तेलंग (Suresh Telang), विनोद माने (Vinod Mane),
आप्पासाहेब चैनगुंडा (Appasaheb Changunda) यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-arrest bail application) दाखल केला होता.
यावेळी फिर्यादी यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून सदर आरोपी यांनी वानवडीचा (Wanwadi)
गुन्हा मागे घेण्याकरिता रेकॉर्डवरील गुन्हेगाराची (Pune Crime) मदत घेऊन फिर्यादीला धमकावले व आज तागायात धमकावत आहेत असा युक्तिवाद केला.
ॲड. विजयसिंह ठोंबरे यांची बाजू ऐकून घेत न्यायाधीश ए. एन. मरे (Judge A. N. Murray) यांनी हंगामी अटकपूर्व जामीन
अर्जावर धनराज घोगरे व त्यांचे साथीदारास कोणताही दिलासा न देता या गुन्ह्यातील तपासी अधिकारी यांचे म्हणणे मागवले असल्याचे अॅड. ठोंबरे यांनी सांगितले.

 

काय आहे प्रकरण

 

फिर्यादी निखील दिवसे (Nikhil Divase) यांना महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 विद्यमान नगरसेवक धनराज घोगरे व त्यांचे साथीदार सुरेश तेलंग,
विनोद माने पाटील यांचे विरुद्ध महानगरपालिका (Pune Corporation) ठेकेदाराचे काम देतो असे आमिष दाखवून निखिल दिवसे कडून 3 लाख घेऊन काम न देता फसवणूक केली.
तसेच हाताने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी 21 ऑक्टोबर रोजी दिवसे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात
(Wanwadi Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी निखील दिवसे यांना सराईत गुन्हेगार सदा ढावरे (Sada Dhaware) याच्या मार्फत तुषार पाटील
Tushar Patil (विद्यमान नगरसेविकेचे पती) यांचे सांगण्यावरून धनराज घोगरे यांची तक्रार मागे घेण्याकरिता जबरदस्तीने अपहरण केले. अपहरण करून कोर्टामध्ये घेऊन गेले.
निखिल दिवसे वानवडीची केस माघारी न घेतल्यास त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे बरेवाईट करण्याची धमकी देण्यात आली होती.
तसेच केस माघारी न घेतल्यास त्याच्यावर खंडणीची केस करु अशी धमकी दिली होती. त्यावेळी तुषार पाटील याने निखिल दिवसे यास वकिलाकडे जाऊन ॲफिडेव्हीट कर असे सांगितले होते.

त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी, सुरेश तेलंग व धनराज घोगरे यांचे दोन लोक हजर होते. त्यावेळी सदा ढावरे व इतर दोन लोकांनी केस माघारी
घेण्यासाठी निखिल दिवसेला गाडीवरून बसून कोर्टामध्ये आणले व ॲफिडेव्हीट करण्यासाठी बळजबरी केली.
परंतु निखिल दिवसे याने लघवीचा बहाणा करून तात्काळ तेथून पळ काढत दत्तवाडी पोलिस स्टेशन (Dattawadi Police Station)
गाठले व नगरसेवक धनराज घोगरे सह सुरेश तेलंग,
विनोद पाटील व इतर लोकांविरुद्ध अपहरणाचा तसेच गुन्हा मागे घेण्याकरिता दबाव टाकल्याचा गुन्हा (pune Crime) दाखल केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | BJP councilor Dhanraj Ghogre’s pre-arrest bail application was rejected by the shivajinagar court Adv. Vijay Singh Thombre

 

हे देखील वाचा :

Madhuri Dixit | माधुरी दिक्षीतच्या मुलाचे लांब-घनदाट केस पाहून मुलीही लाजतील! ‘या’ कारणामुळे कापावी लागली वेणी

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ; पत्नी डिंपल सोमजीची येरवडा जेलमध्ये ‘रवानगी’

Nashik-Pune Highway | नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्याचं काम अपूर्ण असूनही टोल वसुली; कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड

 

Related Posts