IMPIMP

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ; पत्नी डिंपल सोमजीची येरवडा जेलमध्ये ‘रवानगी’

by nagesh
Pune Crime | Fraud case! Increase in police custody of Alnesh Somji; Wife Dimple Somji sent to Yerawada Jail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil Somji), डिंपल अलनेश सोमजी Dimple Alnesh Somji (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथकाने (Anti extortion Cell) दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) ताब्यात घेतले होतं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणण्यात आलं. पुण्यातील शिवाजीनगर येथील एमपीआयडी कोर्टानं त्यांना 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सोमजी दाम्पत्याची आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज (सोमवार) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अलनेश सोमजी याच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ केली आहे. तर पत्नी डिम्पल सोमजी हिला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे. त्यामुळं डिंपल सोमजीची येरवडा कारागृहात (Yerwada Jail) रवानगी करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अखिलेश सोमजी आणि त्याची पत्नी डिंपल सोमजी यांनी पुण्यातील नागरिकांना 24 टक्के वार्षिक पतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य फरार झाले होते.
आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout notice) जारी केली होती.

 

दिल्ली येथून पुण्यात (Pune Crime) आणल्यानंतर सोमजी दाम्पत्याला शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर करण्यात आले होते.
त्यावेळी न्यायालयाने 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडीची आज मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने अलनेश याच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ केली आहे.
तर 12 डिम्पल सोमजी हिला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून डिम्पलची रवानगी येरवडा कारागृहात (Yerawada Jail) करण्यात आली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, श्रीलंका (Sri Lanka) मार्गे कॅनडला (Canada) पळून जाण्याच्या तयारीत असताना सोमजी दाम्पत्याला दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने
(Immigration) ताब्यात घेऊन पुणे पोलिसांना (Pune Police) याची माहिती दिली.
खंडणी विरोधी पथकाने दिल्ली येथे जाऊन दोघांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करुन दिल्ली कोर्टात (Delhi court) हजर केल.
दिल्ली कोर्टाने त्यांना दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर (Transit remand) पाठवले. त्यानंतर खंडणी विरोधी पथक त्या दोघांना घेऊन पुण्यात आले.
आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
मुदत संपल्यानं आज त्यांना पुन्हा कोर्टात (Pune Court) हजर करण्यात आले.
त्यानंतर न्यायालयाने अलनेशच्या कोठडीत 3 दिवसांची वाढ केली तर पत्नी डिंपल सोमजीची रवानगी 12 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे,
राहुल उत्तरकर यांच्या पथकाने सोमजी दाम्पत्यास दिल्लीतून अटक केलं होतं.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | Fraud case! Increase in police custody of Alnesh Somji; Wife Dimple Somji sent to Yerawada Jail

 

हे देखील वाचा :

Nashik-Pune Highway | नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्याचं काम अपूर्ण असूनही टोल वसुली; कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड

Pune Gang Rape | पुणे हादरलं | नवरा हॉस्पीटलमध्ये असल्याचं समजताच नराधमांनी केली ‘गेम’, 29 वर्षाच्या विवाहितेला गोठयात डांबून केला ‘गँगरेप’

RBI Rules | बँकेने फाटलेल्या, झिजलेल्या नोटा बदलण्यास दिला नकार तर होऊ शकते कारवाई, जाणून घ्या नियम

 

Related Posts