IMPIMP

Pune Crime Branch Police | बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime Branch Police | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत लाखो रूपयांची खंडणी मागीतल्याचा (Ransom) प्रकार उघडकीस आला होता. तसेच खंडणी दिली नाहीतर बदनामी करण्याची धमकी आरोपी राजेश बजाज आणि बापू शिंदे यांनी बांधकाम व्यावसायिकास दिली होती. याप्रकरणी पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक (Anti-ransom squad) दोनने आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेश उर्फ बॉबी खैरातीलाल बजाज उर्फ सचदेव Rajesh alias Bobby Khairatilal Bajaj
alias Sachdev (रा. अंकुर सोसायटी, कमला नेहरु पार्क, शिवाजीनगर) आणि बापू गोरख शिंदे Bapu Gorakh Shinde (रा. मानाजीनगर, नऱ्हे रोड)
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार डिसेंबर 2019 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला होता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथकाला मुख्य आरोपी राजेश बजाज हा एम.जी. रोडवरील लष्कर न्यायालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून बजाज याला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी बापू शिंदे याला नऱ्हे येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी विरोधात डेक्कन (Deccan Police Station), कोरेगाव पार्क (Koregaon Park Police Station) आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 असे एकुण चार गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhre), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), अंमलदार सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, प्रविण पडवळ, संग्राम शिनगारे, विजय गुरव, संपत औचरे, सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title: Pune Crime Branch Police | Adv. Rajesh Bajaj, Bapu Shinde arrested by pune police Crime Branch

 

हे देखील वाचा :

BJP | भाजपला मोठा झटका ! राज्यात BJP मधून आऊटगोइंग सुरू

Life Insurance Fitness Rewards | फिट रहा आणि इन्श्युरन्स प्रीमियमवर सूट मिळवा, जाणून घ्या IRDAI च्या उपक्रमाबाबत

Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जर तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये खाते तर होईल 15 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा

 

Related Posts