IMPIMP

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | भंगार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाने विस हजार रुपये किमतीचे 200 लिटर डिझेल चोरल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी फरार आरोपी चालकाला अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) सावेड येथून अटक (Arrest) केली (Pune Crime) आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रविंद्र महादेव खामकर Ravindra Mahadev Khamkar (सध्या रा. ओतूर, ता. जुन्नर, मुळ रा. देवळा, ता. अंबाजोगाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन अशोक लडकत Sachin Ashok Ladkat (वय-37 रा. लडकतवाडी, ता. दौंड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 7 मे रोजी फिर्याद दिली होती. आरोपीने कर्नाटक (Karnataka) ते लोणी काळभोर प्रवासा दरम्यान डिझेल चोरी केली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवार (दि.6) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टान्सपोर्टचा व्यवसाय (Transport Business) आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीच्या ट्रक (एमएच 12 सीएफ 7797) मध्ये पुणे ते बेंगलूर असे भंगार तसेच सिमेंट वाहतूक करण्यासाठी आरोपी चालक रविंद्र खामकर याच्याकडे दोन महिन्यांपूर्वी दिला होता. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन ट्रकच्या डिझेल टाकीतील 20 हजार रुपये किमतीचे 200 लिटर डिझेल चोरी करुन त्याची विक्री केली.

 

गुन्हा (FIR) दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. त्याचा तांत्रीक मदतीने शोध घेतला असता तो कर्नाटक, तामिळनाडू (Tamil Nadu), गुजरात (Gujarat) तसेच विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada) या ठिकाणी जाऊन सतत ठिकाण बदलत होता. सोमवारी (दि.3) दुपारी आरोपी रविंद्र खामकर हा अहमदनगर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी (Pune Police) अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी परिसरातील एका हॉटेलमधून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले डिझेल वेळापूर, महुद, अकलूज, भिगवण या ठिकाणी विकल्याची माहिती दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे (PSI Vaibhav More), पोलीस नाईक संभाजी देविकर,
संतोष राठोड, पोलीस अंमलदार शैलेश कुदळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

 

हे देखील वाचा :

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

Pune Crime | थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, परिसरात खळबळ

Vegetables For Cholesterol | कोलेस्ट्रॉल शोषून घेऊन रक्त वाहिन्यांना स्वच्छ आणि मजबूत बनवू शकतात ‘या’ 5 भाज्या

 

Related Posts