IMPIMP

Pune Crime | धक्कादायक! शवविच्छेदन केलेल्या मृतदेहांचे अवशेष खातात भटकी कुत्री आणि डुक्करं

by nagesh
Pune Crime | baramati youth knife attack on girl in her office Baramati City Police Station on the spot

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन अपघातात (Accident) किंवा संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन (Postmortem) करण्यात येते. मात्र, पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर (Indapur) येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-district hospital) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या शवविच्छेदन गृहाशेजारीच शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तींचे अवशेष उघड्यावर टाकण्यात आले. हे अवशेष भटकी कुत्री, डुक्करे आणि इतर प्राणी खात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा बेफिकीरपणा दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चैकशी करुन संबंधितांवर कडक करवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

मयत व्यक्तीचे शवविच्छेदन केल्यानंतर शरीराचे अवशेष काढून ते एन्झायमच्या (Enzyme) मदतीने प्लास्टीकच्या बरणीत साठवले जातात. त्यानंतर ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत (Laboratory) पाठवले जातात. मात्र काही कालावधीनंतर हे अवशेष नष्ट करायचे असता. मात्र इंदापूर उपजिल्ही रुग्णालयाने तसे न करता अवशेष प्लास्टिक बरणीसह शवविच्छेदन गृह शेजारी उघड्यावर जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु मांसाचे तुकडे व्यवस्थित जळले गेले नसल्याने ते उघड्यावर पडले. हे तुकडे कुत्री, डुक्करे खात असल्याचे समोर आले आहे.

सोमवारी (दि.27) जनार्धन गोळे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी या ठिकाणी आणले होते. त्यावेळे त्यांचे नातेवाईक गणेश पवार हे त्या ठिकाणी आले. त्यांना हा प्रकार दिसल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.

यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर (District Surgeon Dr. Ashok Nandapurkar) यांनी सांगितले, साठवलेले अवशेष हे दोन-तीन दिवसांत पोलीस विभागाने (Police Department) आपल्या ताब्यात घ्यायचे असतात.
जर ते नेले नाहीत तर त्याची आम्हाला गरज नाही म्हणून ते नष्ट करण्यासठी त्याबाबत पोलीस लेखी पत्र देतात.
या संदर्भात विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया आपल्याला माहित नाही, संबंधित विभागाला ते विचारावे लागेल.
मात्र इंदापूर रुग्णालय आवारात टाकण्यात आलेल्या अवशेष याबद्दलची माहिती आपल्याला नाही असे घडले असेल तर ते चुकीचे आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title : Pune Crime | dogs and pigs eat the dead body parts at indapur sub district hospital of pune district 

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; जाणून घ्या आजचा भाव

BJP MLA Nitesh Rane | शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; उद्या न्यायालयात सुनावणी

Property Tax Pune | पाच वर्षात पाणीपट्टी 100 टक्क्यांनी वाढली; परंतू पुणेकरांना अद्याप ‘चोवीस तास’ पाणी पुरवठा नाही; मिळकत करामध्ये 11 टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव

 

Related Posts