IMPIMP

Pune Crime | कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार; कंपनीच्या संचालकावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by nagesh
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कंपनीतील २१ कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund – PF) कपात करुन तो कर्मचार्‍यांच्या खात्यात भरला नाही तसेच कंपनीकडील रक्कमही न भरता साडेचार लाख रुपयांचा अपहार (Appropriation) केल्या प्रकरणी एका कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी भानुप्रकाश कोटीकलपुडी (Bhanuprakash Kotikalpudi) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्यद (गु. रजि. नं. २८९/२२) दिली आहे.
त्यानुसार एस एन सिस्टम प्रा. लि. (SN System Pvt. Ltd.) कंपनीचे संचालक ओमकार सुनिल नाती Omkar Sunil Nati (रा. सहकारनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार ऑगस्ट ते डिसेंबर २०१९ मध्ये घडला. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस एन सिस्टम प्रा. लि. या कंपनीचे संचालक ओमकार नाती
यांनी कंपनीतील २१ कर्मचार्‍यांचे ऑगस्ट ते डिसेंबर २०१९ च्या मासिक पगारातून २ लाख १८ हजार १४४ रुपये भविष्य निर्वाह निधी (PF) कपात केला.
तो कर्मचार्‍यांचे खात्यात भरला नाही. तसेच कंपनीकडील २ लाख ३६ हजार ३२४ रुपये कर्मचार्‍यांच्या खात्यात
भरणे आवश्यक असताना ही रक्कम न भरता एकूण ४ लाख ५४ हजार ४६८ रुपयांचा
अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक शितोळे (Sub-Inspector of Police Shitole) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | embezzlement of employees’ provident fund; A case has been registered against the director of the company in Wanwadi police station

 

हे देखील वाचा :

EPFO Update | नोकरदार लोकांना मिळतील 81,000 रुपये, जाणून घ्या तारीख आणि चेक करण्याची पद्धत

Umesh Kolhe Murder Case | अमरावती येथील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर आर्थर रोड जेलमध्ये हल्ला

Pune Crime | महिलेने 73 वर्षाच्या ज्येष्ठाकडे मागितली 20 लाखांची खंडणी; विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा

 

Related Posts