IMPIMP

Umesh Kolhe Murder Case | अमरावती येथील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर आर्थर रोड जेलमध्ये हल्ला

by nagesh
Umesh Kolhe Murder Case | umesh kolhe amravati murder case prisoners have attached on shahrukh pathan in arthur road jail

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Umesh Kolhe Murder Case | नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या अमरावती मधील पशुवैद्यकीय औषध व्यावसायिक (Veterinary Medicine Professional) उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील (Umesh Kolhe Murder Case ) आरोपींना पोलिसांनी (Amravati Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) ठेवण्यात आले आहे. या आरोपींवर हल्ला (Attack) करण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील (Umesh Kolhe Murder Case) आरोपी शाहरुख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान Shah Rukh Pathan alias Badshah Hidayat Khan (वय-25) याला अटक केली होती. या आरोपीची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या शाहरुख पठाणवर आर्थर रोड कारागृहात हल्ला करण्यात आला आहे. आर्थर रोड जेलच्या ब्रॅक नंबर 7 मध्ये हा हल्ला करण्यात आला आहे.

 

कल्पेश पटेल (Kalpesh Patel), हेमंत मनियार (Hemant Maniar), अरविंद यादव (Arvind Yadav),
संदीप जाधव (Sandeep Jadhav) आणि श्रवण आवणे (Shravan Awane) या आरोपींनी शाहरुखवर हल्ला केला.
याप्रकरणी एनएम जोशी पोलिसांनी (NM Joshi Police) गुन्हा दाखल केला आहे. एनआयएने (NIA) या प्रकरणात सात जणांना ताब्यात घेतले आहे.
सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांची हत्या करण्यात आली.
कोल्हे त्यांचे मेडिकल स्टोअर बंद करुन घरी जात असताना त्यांची निर्घृण हत्या केली होती.
त्यावेळी संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. मुलगा संकेतनं दिलेल्या
तक्रारीवरुन मोटारसायकलवरुन आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांच्या गळ्यावर चाकूनं हल्ला केला.
आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Umesh Kolhe Murder Case | umesh kolhe amravati murder case prisoners have attached on shahrukh pathan in arthur road jail

 

हे देखील वाचा :

Sukanya Samriddhi Yojana मध्ये मोठा बदल ! आता तीन मुलींसाठी जमवू शकता मोठा पैसा, जाणून घ्या सविस्तर

Shivsena | ‘नारायण राणे भाजपच्या टाकलेल्या तुकड्यावर जगतात’, शिवसेनेची टीका

Pune Crime | व्हिडिओ काढल्याच्या संशयावरुन महिलेच्या त्रासाने तरुणाने केली आत्महत्या; खडक पोलिस ठाण्यात गुन्हा

 

Related Posts