IMPIMP

Pune Crime | पुण्यात सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Famous actor Aniket Vishwasrao has been charged with domestic violence and assault by his wife and actress Sneha Vishwasrao-Chavan in alankar police station of pune pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद (Pune Crime) दिली आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव sneha Aniket Vishwasrao (वय 29, रा. करिष्मा सोसायटी, कर्वे रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भितीने जीवे मारण्याची धमकी देऊन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हाताने मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. अनिकेत विश्वासराव याच्याबरोबर त्याच्या आईवडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासराव आणि स्रेहा चव्हाण (Actress sneha Chavan) यांचा 2018 मध्ये विवाह झाला आहे. स्रेहा चव्हाण यांनी मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. अनिकेत विश्वासराव हा मुळचा मुंबईचा आहे़ गेल्या काही दिवसांपासून स्नेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. स्रेहा हिने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका माध्यमातून अभिनेता म्हणून सर्वपरिचित आहे.
सुधीर मिश्राच्या चमेलीमधून त्याने पर्दापण केले आहे. लपून छपून या मराठी चित्रपट सृष्टीत पर्दापण केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

अनिकेत यांच्यासह चंद्रशेखर रघुनाथ विश्वासराव (Chandrashekhar Raghunath Vishwasrao)
आणि अदिती चंद्रशेखर विश्वासराव (Aditi Chandrashekhar Vishwasrao) यांच्या विरुद्ध देखील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Pune Crime | Famous actor Aniket Vishwasrao has been charged with domestic violence and assault by his wife and actress Sneha Vishwasrao-Chavan in alankar police station of pune pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यु; पुण्याच्या बोपदेव घाटाजवळील घटना

EPFO-PPO | ‘हा’ नंबर पेन्शनर्ससाठी अतिशय महत्वाचा, अन्यथा अडकू शकतात तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या

Guavas Benefits | वजन कमी करा, खोकला-सर्दीपासून बचाव करा, थंडीमध्ये पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत असंख्य फायदे

 

Related Posts