IMPIMP

Pune Crime | दौंड-पाटस महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला (Sugarcane Tractor) पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या
भीषण अपघातात (Fatal Accident) तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दौंड-पाटस महामार्गावर (Daund-Patas highway) रविवारी
(दि.13) रात्री झाला. ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला रिफ्लेक्टर (Reflector) नसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक (Pune Crime) माहिती मिळत आहे.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गणेश बापू शिंदे Ganesh Bapu Shinde (वय-24), ऋषिकेश महादेव मोरे Rishikesh Mahadev More (वय-23), स्वप्नील सतीश मनोचार्य Swapnil Satish Manocharya (वय-24 तिघे रा. काष्टी ता. श्रीगोंदा, जि. नगर) अशी मत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक विशाल निवृत्ती दिवेकर Vishal Nivritti Divekar (रा. वरवंड, ता. दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ऋषीकेश मोरे या तरुणाचे वडील महादेव गुलाब मोरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषीकेश आणि त्याचे दोन मित्र दुचाकीवर जेवण करण्यासाठी रात्री दौंड-पाटस रस्त्यावर आले होते.
जेवणानंतर दौंडच्या दिशेने येत असताना ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरने अचानक वेग कमी केला.
त्यामुळे दुचाकी पाठीमागून जोरात धडकली. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकी चालवणाऱ्या चालकाला ट्रॉलीचा अंदाज न आल्याने धडक झाली.

 

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.
मात्र, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळी न थांबता निघून गेल्याचे फिर्य़ादीत नमूद करण्यात आले आहे.
पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | fatal accident on daund patas highway three died on the spot after a two wheeler collided with a tractor

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा – सुप्रिया सुळे

Neha Malik | “हाय गर्मी…” नेहा मलिकच्या सिझलिंग स्टाइलने चाहते घायाळ, फोटो व्हायरल

Pune Crime | दुचाकीस्वार आणि पीएमपी चालकाची फ्रि स्टाईल हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल

 

Related Posts