IMPIMP

Pune Crime | दुचाकीस्वार आणि पीएमपी चालकाची फ्रि स्टाईल हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल

by nagesh
Pune Crime | heavy fight between pmp driver and bike rider in pune station area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | बससमोर अचानक दुचाकीस्वार आल्याने पीएमपी बस चालकाने (PMP Bus Driver) त्यांना
हटकले. यावरून दुचाकीस्वारांनी पीएमपी बस चालकासोबत वाद (Pune Crime) घातला. याचे रुपांतर हाणामारीत (Beating) झाल्याची घटना पुणे
स्टेशन (Pune Station) परिसरात घडली आहे. दुचाकीस्वार आणि पीएमपी बसचालकाच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर
(Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी (FIR) केल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात रस्त्यावरुन जाताना दुचाकीवरील तरुण आणि पीएमपी चालक-वाहकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वारांनी बस चालकाला चक्क चपलेने मारल्याचे दिसत आहे. सगल तिसऱ्या दिवशी अशा प्रकारचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. (Pune Crime)

 

रविवारी स्वारगेट डेपोची (Swargate Depot) बस पुणे स्टेशन परिसरात आली.
त्याठिकाणी दुचाकीवरुन जाणारे दोन तरुण बसला आडवे आले. त्यामुळे चालकाने त्यांना हटकले.
यावेळी दोघांनी एकमेकांच्या चुका सांगत वाद घातले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
तरुणांनी थेट चालकाची कॉलर पकडून चालकाला चपलेने मारण्यास सुरुवात केली.
त्यावेळी वाहक देखील गाडीतून उतरला. त्याने एका तरुणाला मारहाण केली. त्यानंतर काही नागरिकांनी मध्यस्थी करुन ही भांडणे थांबवली.

 

 

Web Title :- Pune Crime | heavy fight between pmp driver and bike rider in pune station area

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या किती

Pune Crime | गुंड निलेश वाडकर याच्या बायकोविरुद्ध गुन्हा दाखल; तरुणाचे अपहरण करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार; ‘या’ कारणामुळे केली घोषणा, जाणून घ्या नेमकं काय घडलं

SSC, HSC Exam 2023 | दहावी आणि बारावीला बाहेरून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचा मोठा दिलासा

 

Related Posts