IMPIMP

Pune Crime | सिंहगड रोड परिसरात महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण, विनयभंग करणाऱ्या 7 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | FIR against 7 persons for indecently assaulting and beating a woman in Sinhagad Road area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पत्र्याच्या शेडची तोडफोड करुन महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Swearing) करुन महिलेला आणि तिच्या मुलाला बेदम मारहाण (Beating) करत विनयभंग (Molestation) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड परिसरात (Sinhagad Road Area) घडली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 मध्ये घडला आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी (Pune Police) सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 50 वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी श्रीकांत दोडमणी (Srikant Dodmani) आणि त्यांच्या इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी शुक्रवारी (दि.31 मार्च) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा प्लॉट शेजारी शेजारी आहे. घटनेच्या दिवशी आरोपी आणि त्याच्या इतर साथिदारांनी जागेच्या कारणावरुन महिलेच्या पत्र्याच्या शेडची तोडफोड करत असताना पीडित महिलेने आणि त्यांच्या मुलाने याबाबत आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी महिलेला आणि त्यांच्या मुलाला अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन महिलेचा विनयभंग केला.

 

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पत्र्याच्या शेडमधील सामान बाहेर आणून जाळले.
तसेच महिलेचे संसार उपयोगी साहित्य जबरदस्तीने टेम्पोत भरुन घेऊन निघून गेले.
आरोपींनी 65 हजार रुपयांचे सामान जबदस्तीने घेऊन गेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | FIR against 7 persons for indecently assaulting and beating a woman in Sinhagad Road area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फरार झालेल्या प्यासा हॉटेलच्या मालकांना पोलिसांकडून अटक

Uddhav Thackeray And Dilip Walse-Patil | राष्ट्रवादी शिवसेनेला गृहखातं देणार ?; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

Rule Changes Bank PF GST Medicines | 1 एप्रिलपासून 10 मोठे बदल ! औषधं महागणार, बँकेचे नियम, GST तही बदल, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts