IMPIMP

Rule Changes Bank PF GST Medicines | 1 एप्रिलपासून 10 मोठे बदल ! औषधं महागणार, बँकेचे नियम, GST तही बदल, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Business Ideas | business ideas start your own business with take franchise and earn 80k monthly

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rule Changes Bank PF GST Medicines | मार्च महिना संपल्यानंतर आज नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच एप्रिल महिना सुरु होतो आहे. दरम्यान दरवर्षीनुसार यंदाच्या नव्या आर्थिक वर्षातही काही मोठे बदल झाले आहेत. या नव्या बदलाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. औषधांचे दर वाढणार आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर असलेली विशेष सवलत देखील बंद होणार आहेत. इंधन, गॅस दरवाढ (Petrol Diesel CNG LPG Price Hike) याचाही फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. (Rule Changes Bank PF GST Medicines)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, नवीन आर्थिक वर्ष 2022 – 2023 च्या पार्श्वभूमीवर नेमकं आजपासून होणारे बदल कोणते असणार आहेत ? याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Rule Changes Bank PF GST Medicines)

औषधांचे दर वाढणार – यामध्ये 1 एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरस सह अत्यावश्यक औषधांचे दर वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून जादा दरवाढ करण्यास परवानगी दिलीय. म्हणून जवळपास 800 औषधांच्या किंमती वाढणार आहे.

 

1 एप्रिल 2022 पासून पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना आयकर कायद्याच्या कलम 80EEA अंतर्गत मिळणारा लाभ केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

इंधन दरवाढ सुरू असताना आता घरगुती एलपीजी गॅस (LPG gas) दरवाढीची झळ ग्राहकांना बसू शकते. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमंतीत 50 रुपयांनी वाढ झाली होती. 1 एप्रिल रोजी नवीन किंमत जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 एप्रिल 2022 पासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे केवळ बचत खात्यात उपलब्ध असतील.
पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही.
सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे बंधनकारक केले आहे.

 

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा रोखीने देता येणार नाहीत.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला युपीआय अथवा नेटबँकिंगचा वापर करावा लागणार आहे.

 

1 एप्रिल 2022 पासून विद्यमान पीएफ खाते 2 भागांमध्ये विभागले जाऊ शकते.
त्यावर कर आकारणी होऊ शकते. ईपीएफ खात्यामध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक पाच लाख रुपये आहे.

 

CBIC (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ) ने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई – इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल मर्यादा पन्नास कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून वीस कोटी रुपये करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोरोना काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), एचडीएफसी बँक (HDFC Bank) यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी (FD) योजना सुरू झाली होती.
या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत होता.
आता काही बँका या योजना बंद करण्याची शक्यता आहे.

 

1 एप्रिल 2022 पासून क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागू होणार आहे.
व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) अथवा क्रिप्टोकरन्सी विकून मिळालेल्या नफ्यावर तीस टक्के कर लागणार आहे.

 

1 एप्रिल 2022 पासून त्यांच्या वाहनांच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली.
टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे म्हटले.
मर्सिडीज – बेंझ इंडियाने 1 एप्रिलपासून आपल्या वाहनांच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ करणार असल्याचेही म्हटले आहे.
टोयोटा 1 एप्रिल 2022 पासून आपल्या वाहनांच्या किमती 4 टक्क्यांनी वाढवणार आहे.
BMW किमती 3.5 टक्क्यांनी वाढणार असल्याचे समोर आले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rule Changes Bank PF GST Medicines | changes from april 1st rules related to pf gst medicines will change financial year 2022 2023 Petrol Diesel CNG LPG Price Hike

 

हे देखील वाचा :

Diabetes Patients Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ‘ब्लड शुगर’

Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सतीश उकेंना ED ने अटक करताच नाना पटोलेंची सावध भूमिका; म्हणाले…

Pune Police | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

 

Related Posts