IMPIMP

Pune Crime | पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मैत्रिणीवर FIR

by nagesh
Maharashtra Police News | maharashtra amravati police officer jumps from fourth floor of police headquarters

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दारुच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी (Seriously Injured) करणाऱ्या पोलीस कर्मचारी (Pimpri Chinchwad Police Personnel) आणि त्याच्या मैत्रिणीवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) मोशी (Moshi) येथील दक्षिण लक्ष्मीनगर मध्ये सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला आहे. जखमी महिलेवर भोसरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नितीन कैलास औटी Nitin Kailas Auti (वय – 35 रा. दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी) आणि त्याच परिसरात राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपी नितीन औटीच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन औटी हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपी आणि त्याची मैत्रिण दारु पिऊन (Drinking Alcohol) घरी आले. त्यांनी फिर्यादी यांचा घरात शोध घेतला. मात्र घाबरलेल्या फिर्यादी लपून बसल्याने त्या सापडल्या नाहीत.

 

यानंतर आरोपी घरातून बाहेर निघून गेले. फिर्यादी यांनी सोसायटीच्या गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला (Security Guard) पती आणि त्याची मैत्रिण कुठे गेले याबाबत विचारणा केली. सुरक्षा रक्षकाने आरोपी नितीन औटी यांना फोन करुन तुमची पत्नी घरी असल्याची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी घरी आले. आरोपी औटी याने पत्नीला कुठे गेली होतीस असे म्हणत घरामध्ये बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी सोसायटीच्या गेटवर आल्या. आरोपीने गेटवर येऊन फिर्यादी यांना पोटात, छातीत लाथा बुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फिर्यादी यांनी या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील बहिणीला दिली.
बहिणीने तात्काळ भोसरी येथे जाऊन फिर्यादी यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | FIR against pimpri chinchwad policeman and his girlfriend for beating his wife

 

 

हे देखील वाचा :

Shweta Sharma Bold Photo | भोजपुरी अभिनेत्रीनं साडीमधील अशा अंदाजाने इंटरनेटवर लावली आग; नेटकरी म्हणाले – ‘एकदम देसी भाभी…’

Ajit Pawar | CM उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे बोलून दाखवली नाराजी; अजित पवार म्हणाले…

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचा आलेख चढाच ! दररोज होतेय 84 पैशांनी वाढ, व्यावसायिकांचे गणित कोलमडले

 

Related Posts