IMPIMP

Pune Crime | काजूकतली फुकट न दिल्याने गोळीबार; सिंहगड रोडवरील मिठाईच्या दुकानातील घटना

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | काजूकतली फुकट दिली नाही, या कारणावरुन दोघांनी मिठाईच्या दुकानात गावठी पिस्तुलातून (Pistol) गोळीबार (Firing) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. (Pune Crime)

 

सुरज ब्रह्मदेव मुंडे Suraj Brahmadev Munde (वय २३, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक (Arrest) केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्याजवळ फुलपरी स्वीट मॉल (Phulpari Sweet Mall) हे दुकान आहे. दुकान सुरु असताना सोमवारी दुपारी ४ वाजता दोन तरुण आले. त्यांनी एक किलो काजू कतली घेतली. दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा दुकानदाराने पैसे नाही तर काजूकतली परत दे, असे सांगितले. त्यावर त्यांच्यातील एकाने दुकानदारावर पिस्तुल रोखले. त्यांच्या दिशेने ४ वेळा फायर केले. परंतु, त्यातून गोळी उडली नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पिस्तुलातून एकही गोळी न उडाल्याने त्याने पिस्तुल खाली घेऊन तिचा ट्रिगर पुन्हा दाबला तर त्यातून एक गोळी उडून खाली पडली. हा प्रकार पाहून दुकानात गर्दी झाली. तेव्हा ते दोघे पळून गेले.
दुकानदाराने मात्र खेळण्यातील पिस्तुल असावे, असे वाटून त्याकडे दुर्लक्ष केले.
ही बाब व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुने (Sachin Niwangune) यांना समजली.
त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe) यांना
याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. दुकानात पिस्तुलातून पडलेली गोळी पाहिली.
तेव्हा ती खरी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Firing for non-payment of cashew nuts; Incident at a sweet shop on Sinhagad Road

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | 350 कोटी लुटून कोणाच्या घशात घातलेले नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार प्रहार

Winter Session 2022 | भुखंड घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मागितला मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा…

Electricity Theft In Pune Wagholi | वाघोलीत पकडल्या मोठ्या वीज चोऱ्या; दोन घटनेत 1 कोटी 44 लाखाची वीजचोरी उघडकीस

 

Related Posts